Wednesday, July 29, 2026
Homeदेसाईगंजमोठ्यांना सोडले अन् लहानग्यांना पकडू लागले; अवैध रेती तस्करीचा जोर अजूनही कायम..!...

मोठ्यांना सोडले अन् लहानग्यांना पकडू लागले; अवैध रेती तस्करीचा जोर अजूनही कायम..! – देसाईगंज तालुक्यातील प्रकार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यात अनादिकाळापासून म्हणजेच रेती घाटांचे लिलाव होण्यापूर्वीपासूनच रेती चोरट्यांकडून मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा करून शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलास चुना लावल्या गेला आहे.अशातच मागील काही महिन्यांपूर्वी तालुक्यात बलाढ्य रेती तस्करांकडून रेती चोरल्या जाऊनही पाहिजे त्या प्रमाणात कारवाई करण्यात आली नसल्याने ‘मोठ्यांना सोडले अन् लहानग्यांना पकडू लागले’, असे हास्यास्पद होऊ लागले आहे.
देसाईगंज तालुक्याला वैनगंगा नदीचे सौभाग्य लाभल्याने तालुक्यात अनेकांनी अवैध रेती तस्करीचा मार्ग अवलंबल्याची साक्ष महसूल आणि पोलिस प्रशासनाकडून हळूहळू करण्यात येत असलेल्या कारवायातून दिसून येत आहे.काही ठिकाणी नियमांना बगल देत शासनाचा महसूल बुडविला जात असल्याने रात्रीच्या वेळी होत असलेल्या वाहतूकीवर नियंत्रण कुणाचे? आणि याला आळा घालणार कोण? असे प्रश्न जनतेकडून उपस्थित केले जात आहेत.त्यामुळे हल्ली अवैध रेती वाहतुकीवर आळा घालण्याचे आव्हान महसूल तथा पोलिस प्रशासनासमोर उभे येऊन ठाकले आहे.परिसरात अनेक गावांतील नदीपात्रातून दिवस-रात्र रेतीची तस्करी होत आहे.ही वाहतूक कोंढाळा,कुरुड, आमगाव,सावंगी,पोटगाव, कोकडी,वीसोरा व इतर परिसरातून केली जाते.कारवाईच्या भीतीने ट्रॅक्टर सुसाट धावतात.अशातच एखादा भीषण अपघात होऊन जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही.रेती तस्करीवर आळा घालण्यासाठी क्वचित कारवाई करून परत रेतीतस्करांसाठी रान मोकळे सोडले जात आहे. त्यामुळे अवैध रेती तस्करीचा जोर अजूनही तालुक्यात कायम असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.आता जिल्हा पोलिस अधीक्षक हा प्रकार थांबवतील,अशी जनतेची अपेक्षा आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!