Friday, October 23, 2026
Homeगडचिरोलीअन् महिला सरपंचाच्या कामात पतीच करतो लुडबुड.. - शासनाच्या आदेशाला केराची टोपली..

अन् महिला सरपंचाच्या कामात पतीच करतो लुडबुड.. – शासनाच्या आदेशाला केराची टोपली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये आरक्षणामुळे महिला सरपंचपदावर आरूढ झाल्या, परंतु,बहुतांशी ग्रामपंचायतीत महिला सरपंचांच्या कारभारात पतींचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. सरकारने हे रोखण्यासाठी कायद्याचा बडगा उगारला असला तरीही गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावातील ग्रामपंचायतींचा कारभार हा सरपंच महिलांचा पतीच चालवत असल्याचे चित्र आहे.
राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातील बऱ्याच गावात ‘महिला’ सरपंच आहेत; मात्र,बहुतांश ठिकाणी महिला सरपंचांच्या कामात त्यांचे पती सर्वत्र सर्रासपणे लुडबुड करतांना दिसतात.गडचीरोली जिल्हाच नव्हे तर राज्यातही हा प्रकार पुढे आला होता.त्यामुळे राज्य शासनाने एक आदेश काढून महिला सरपंचांच्या कामात पती अथवा इतर नातेवाइकांचा हस्तक्षेप चालणार नाही; असे स्पष्ट केले हाते.परंतु,तरीही आजही अनेक गावात महिला सरपंचांच्या अधिकारावर गदा आणून पतीदेवाचा राजरोसपणे हस्तक्षेप सुरू असल्याचे अनेक ग्रामपंचायतीत दिसत आहे.परिणामी ‘महिला सरपंच नावाला आणि पतीदेव गावाच्या कारभाराला’ अशी परिस्थिती सध्या पहायला मिळत आहे.अनेक ग्रामपंचायतीत महिला सरपंचांचे पती हे कर्मचाऱ्यांना दमदाटी करणे,बारीक-बारीक चुका काढून टोमणे मारणे,या त्रासाला कंटाळून कामगार कामाला जाण्यासाठी टाळाटाळ करू लागले आहेत.विशेष म्हणजे,ग्रामसेवकांनी तसेच सरपंचांनी  पतीदेवाला समज देणे गरजेचे आहे; परंतु, तसे होतांना दिसत नाही.कर्मचाऱ्यांना उद्धट वागणूक देत असतांना ग्रामसेवक यांच्याकडून कोणताही विरोध करण्यात येत नाही; त्यामुळे यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाईची मागणी जनसामान्यांतुन होऊ लागली आहे.त्यामुळे याकडे पंचायत समितीचे संवर्ग गटविकास अधिकारी लक्ष देतील का? असा सवाल नाव न छापण्याच्या अटीवर काही नागरिकांनी केला.
सरपंचांचा त्याच्या गावात वेगळाच तोरा असतो.एक वेगळाच सन्मान असतो.मात्र,महिला सरपंच असल्यास कामकाजामध्ये बऱ्याचदा त्यांच्या पतीचा अथवा इतर नातेवाइकांचा हस्तक्षेप कायम असतो. पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये नातेवाइकांनी मुळीच बसता कामा नये, असेही सरकारी आदेशात म्हटले आहे; परंतु,अनेक गावा-गावातील पदाधिकारी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली; पीएम किसान योजनेचे दोन हजार येणार बँक खात्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या देशातील कोट्यवधी शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी असून प्रतीक्षा संपली आहे.येत्या,शुक्रवार...

कुरुड रेती घाटाचे टीप्पर कोंढाळ्याच्या रस्त्यांवरून.. -वाहनात क्षमतेपेक्षा अधिकची रेती; संबंधित विभागाचे दुर्लक्ष..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-काही महिन्यांपासून देसाईगंज तालुक्यात बंद असलेला रेतीचा खेळ आणखी पुन्हा सुरू झाल्याने "दाल में कूछ काला है भाया"अशी म्हणण्याची वेळ आली आहे.पैश्याच्या...

शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आमदार विजय वडेट्टीवार.. – थकाबाई तलावातून पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा; १३५ कोटींच्या सिंचन निधीचीही घोषणा..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम ​सिंदेवाही(चंद्रपूर):-धानाचे पीक अंतिम टप्प्यात असतांना सिंचनासाठी पाण्याची तीव्र गरज निर्माण झाल्याने सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले होते.शेतकऱ्यांची ही बिकट परिस्थिती लक्षात...

आंधळी-नवरगाव येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची भेट; गावातील समस्यांचा घेतला आढावा -बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या निवेदनाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुटुंब सक्षमीकरण आणि कुटुंब आधारित पर्यायी काळजी प्रकल्पांतर्गत आयोजित बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या माध्यमातून कुरखेडा तालुक्याच्या आंधळी नवरगाव येथील नागरिकांनी मांडलेल्या बससेवा,शिक्षण,आरोग्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!