Tuesday, July 21, 2026
Homeब्रम्हपुरीदुचाकींची समोरासमोर धडक; दोन्ही दुचाकीवरील चालक हवेत उडाले.. - एकाचा मृत्यू तर...

दुचाकींची समोरासमोर धडक; दोन्ही दुचाकीवरील चालक हवेत उडाले.. – एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-दोन दुचाकींच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ब्रम्हपुरी ते वडसा मार्गावरील स्वागत मंगल कार्यालयाजवळ घडली.शुभम मनोहर बनकर वय २७ वर्षे रा.पिंपळगाव (भोसले)असे मृतकाचे नाव आहे.
शुभम मनोहर बनकर हा शनिवारी सायंकाळी एमएच ३४ बीवाय ३९१३ क्रमांकाच्या आपल्या दुचाकीने सुसाट वेगाने ब्रह्मपुरी ते वडसा मार्गावरील स्वागत मंगल कार्यालयासमोरून जात होता.दरम्यान,विरुद्ध बाजूने येणाऱ्या  एमएच ३६ एडी २३९७ क्रमांकाच्या दुचाकीला समोरासमोर धडक बसली.धडक एवढी भिषण होती की दोन्ही दुचाकीवरील चालक हवेत दुर अंतरावर फेकल्या गेले.
दुसऱ्या मोटारसायकलवरील युवक प्रणय आत्माराम उरकुडे वय २१ वर्षे रा.अर्हेर नवरगाव हा गंभीर जखमी झाला असून त्याला आस्था हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. यात शुभम बनकर याचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!