Tuesday, July 28, 2026
Homeभंडाराअजब-गजब प्रकार.. सुरुवातीला फार्मर प्रोड्युसर कंपनी चालविणाऱ्या इसमाचे अपहरण केले अन् नंतर...

अजब-गजब प्रकार.. सुरुवातीला फार्मर प्रोड्युसर कंपनी चालविणाऱ्या इसमाचे अपहरण केले अन् नंतर सोडले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्यात अनोखा व आगळा वेगळा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.अपहरणकर्त्याने सुरुवातीला अपहरण तर केले. मात्र,पोलिसांची मनात भीती निर्माण झाल्याने सोडून दिले असल्याची घटना दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शनिवारी ११ जानेवारीला सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की,सुमित मंगल मेश्राम वय ३८ वर्षे यांनी १५ ऑगस्ट २०२४ रोजी भंडारा जिल्ह्याच्या ठाणा पेट्रोलपंप येथे खाजगी व्यवसाय म्हणून आदिवासी दुग्ध उत्पादक फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडचे कार्यालय सुरू केले.ही कंपनी शेतकऱ्यांना जनावरे खरेदी करण्याकरिता बँकेमार्फत कर्ज मंजूर करून देते.त्या रकमेतून जनावरे खरेदी करून दिले जात असते.यात नीलेश ठाकरे याने बँकेमार्फत आदिवासी दुग्ध उत्पादक फार्मर प्रोड्युसर कंपनी पेट्रोल पंप ठाणे यांच्याकडून १० लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले होते.त्यापैकी ७ लाख ५० हजार रुपयांची रक्कम नीलेश ठाकरे यांना देण्यात आली होती.उर्वरित असलेली २ लाख ५० हजार रुपयांची रक्कम कंपनीमार्फत गाय खरेदी करण्याकरिता राजस्थान येथील जोधपूर येथील धर्मेंद्र सिंग राठोड यांना बयाणा म्हणून देण्यात आलेली होती.
खरेदी केलेल्या गायी ठाकरे यांना देण्याचे कंपनीने ठरविले होते.दरम्यान,नोव्हेंबर २०२४ पासून नीलेश ठाकरे हा सुमित मेश्राम यांना वारंवार फोन करून गायीसाठी दिलेले बयाणा रक्कम परत द्या,मला आता गायीची आवश्यकता नाही; असे बोलत होता.
रक्कम परत न मिळाल्याने ठाकरे याने ११ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास ठाणा पेट्रोल पंप येथे आला.यावेळी त्याच्यासोबत अन्य इसम होते.
त्याने मेश्राम यांच्याकडे अडीच लाख रुपये परत करण्याची मागण करू लागला.तसेच त्याला व त्याच्य पत्नीला शिवीगाळ करून थापड बुक्क्यांनी मारहाण केली.पैसे परत न मिळाल्याने सुमित मेश्राम याला एक पांढऱ्या रंगाच्या चारचाकीमध्ये बसवून पळवून नेले.
ठाणा पेट्रोल पंप येथून चारचाकी वाहनातून सुमित मेश्राम यांना वाहनातून नेण्यात आले.याचवेळी मेश्राम यांची पत्नी जवाहरनगर पोलिसात तक्रार देण्यासाठी जात असल्याची माहिती नीलेश ठाकरे याला मिळताच सुमितला देव्हाडा येथील एलोरा पेपर मिलसमोर सोडून देण्यात आले.सुमित हा तिथून परतून थेट जवाहरनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिताअंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक भीमाजी पाटील सह पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!