Tuesday, July 28, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिन सोहळा संपन्न..

देसाईगंज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिन सोहळा संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.)देसाईगंज या ठिकाणी काल,रविवार १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी आमदार रामदास मसराम यांचे संस्थेत प्रथमतः आगमनानिमित्त त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.आमदार मसराम यांनी स्वामी विवेकानंद यांचे युवकांसाठी विचार व राजमाता जिजाऊ यांचे देशासाठी संस्कारमय विचार मांडले.युवकांनी त्यांच्या विचारांवर देशाची व समाजाच्या विकासासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.सदर राष्ट्रीय युवा दिन सोहळ्यात वार्षिक उपक्रम,माजी उद्योजक व रोजगार प्राप्त प्रशिक्षणार्थ्यांचे मनोगत,गुणगौरव करण्यात आला.
 दिनांक-८ जानेवारी ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत संस्थेत घेण्यात आलेल्या क्रीडा,विविध सांस्कृतिक कार्यक्रम,विविध सामूहिक व वैयक्तिक, स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.संस्था स्तरावरील व जिल्हास्तरावरील तंत्र प्रदर्शनातील प्रशिक्षणार्थी व निर्देशकांचा व कर्मचारी वृंदांचा सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आफताब आलम खान, मानद सदस्य गोपाल उईके,सदस्य सुशील शिवहरे, मुक्तीपथ तालुका प्रचारक भारती उपाध्याय,सागर वाढई,खालील भाई पठाण,अवसरे वीसोरा इत्यादींची उपस्थित प्रार्थनीय होती.सदर राष्ट्रीय युवा दिन सोहळा संस्थेचे प्राचार्य सुरेश एस.चौधरी यांच्या मार्गदर्शनात यशस्वीरित्या संपन्न झाला.प्रसंगी माजी प्रशिक्षणार्थी, शैक्षणिक तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही आपले विचार मांडले.विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे स्वामी विवेकानंद यांचे संदेश प्रभावी पद्धतीने सादर केले.कार्यक्रमाचे संचालन चंद्रशेखर एम.गरमळे (एन.एस. एस.मुख्य स्वयंसेवक) यांनी केले.तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता मुख्य कार्यक्रम समन्वयक रविकांत एम.गोतमारे,(गटनिर्देशक), एम.एस जाधव प्रभारी गटनिर्देदेशक,गुणेश्वर वांढरे (मुख्य लिपिक),चंदू समर्थ,दामोधर अंबादे,खुशाल उमक,जयंत काटकर,दीपक बोकडे,राजेश भोयर, बादल घरडे,कुमारी क्षमा बोंद्रे,तानाजी सोयाम, आर.सी.निखाडे,भारत नैताम,कुमारी मेघा चौदंते, राहुल कराडे,भडके,शोभा धोटे,धाकडे,(कनिष्ठ लिपिक)शंकर निकुरे,सर्व तासिका निर्देशक एस एन पठाण,गजानन ठाकरे, एम.वाय.कापगते,सतीश.पी.मेश्राम, ए.टी.कोरणकर, श्रीकृष्ण करानकर,व्ही.ओ. मेश्राम, कुमारी ए.आर.सुंदरकर,पूजा मेश्राम,संस्थेचे सुरक्षा रक्षक विभाग,स्वच्छता विभाग कर्मचारी तसेच संस्थेतील एन.एस.एस.स्वयंसेवक,सर्व व्यवसायातील प्रशिक्षणार्थी प्रमुख,सर्वांचे आकर्षक लेझीम नृत्य व स्वागत गीत यातील प्रशिक्षणार्थीं,संस्थेतील सर्व कर्मचारी वृंद तथा सर्व प्रशिक्षणार्थी यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विष्णू वाय. नागमोती(प्रभारी गट निर्देशक) यांनी केले.राष्ट्रगीत व सर्वांच्या सहभोजनाने सदर राष्ट्रीय युवा दिन सोहळा संपन्न झाला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!