Thursday, September 3, 2026
Homeनवी दिल्लीमोठी बातमी; आता शेतकऱ्यांना पिएम किसान निधीचे वर्षाला मिळणार १२ हजार रुपये…-हंगामी...

मोठी बातमी; आता शेतकऱ्यांना पिएम किसान निधीचे वर्षाला मिळणार १२ हजार रुपये…-हंगामी अर्थसंकल्पात घेतला जाणार निर्णय…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नवी दिल्ली :- मोदी सरकारच्या शेवटच्या व अंतरिम अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करून १२ हजारांपर्यंत मदत निधी दिला जाणार असल्याची शक्यता आहे.तसा निर्णय घेतल्यास याचा लाभ ११ कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वतीने १ फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर केला जाणार आहे.सध्या पंतप्रधान किसान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात.या निधीत दुपटीने म्हणजे,आणखी सहा हजार रुपये वाढ केली जाणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात यानंतर थेट १२ हजार रुपये रक्कम जमा होईल; असे सूत्रांचे म्हणणे आहे.एका इंग्रजी वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा करण्याची मोदी सरकारची योजना आहे.महिला शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याचा सरकारचा मानस आहे.महिला शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानअंतर्गत १० हजार ते १२ हजार रुपये जमा करण्याचेही सरकारच्या विचाराधीन आहे.२०१९ साली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर करण्यात आली होती.तसेच धक्कातंत्र देण्याची मोदी सरकारची योजना आहे; असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!