Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवक जाणार लाँग मार्च साठी…-रोजगार हमी योजनेची कामे पडणार...

गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवक जाणार लाँग मार्च साठी…-रोजगार हमी योजनेची कामे पडणार ठप्प…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- विविध मागण्यांना घेऊन ग्रामरोजगार सेवक १५ ते २४ जानेवारी या कालावधीत नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार आहेत.या लाँग मार्चमध्ये गडचिरोली जिल्ह्यातीलही ग्रामरोजगार सेवक सहभागी होणार असून त्याबाबतचे निवेदन ग्रामरोजगार सेवक संघटना गडचिरोलीच्या वतीने संबंधित तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

ग्रामरोजगार सेवकांच्या विविध न्याय मागण्या शासन स्तरावर प्रलंबित असून त्या सोडविण्यात याव्यात; यासाठी राज्यभरातील ग्रामरोजगार सेवक १५ ते २४ जानेवारी या कालावधीत नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार आहेत.या लाँग मार्चमध्ये गडचिरोली जिल्ह्यातीलही ग्रामरोजगार सेवक सहभागी होणार आहेत.त्याबाबतचे निवेदन बाराही तालुक्यातील संघटनांनी संबंधित तहसीलदारांना सादर केले आहे.

सध्या खरीप हंगाम संपला असून रब्बी हंगामातील पिकांची काढणी करण्यासाठी बराच विलंब आहे. या कालावधीत शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे अनेक गावात सध्या रोहयोचे काम सुरू करण्यात आले आहे.यातून शेतकरी, शेतमजुरांना रोजगार मिळाला आहे.मात्र १५ ते २४ जानेवारीपर्यंतच्या लॉग मार्चमध्ये जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवक सहभागी होणार असल्याने मग्रारोहयोचे कामे ठप्प पडणार आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!