उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज,सोमवारी दि.२४ जून रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.या दौऱ्यात ते ५४७ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन,गोसे खुर्द प्रकल्पावर आधारित असलेल्या जलपर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाचे भूमिपूजन करणार आहेत. शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यातही मुख्यमंत्र्यांची उपस्थिती राहणार आहे.
यासंदर्भात आमदार भोंडेकर म्हणाले की, विकासकामासाठी मुख्यमंत्र्यांचा हा जिल्ह्याचा तिसरा दौरा असेल.आज,सोमवारी विविध कार्यक्रमांदम्यान, जलपर्यटनाच्या पहिल्या टप्यातील १०२ कोटींच्या कामाचे भूमिपूजन होईल.भूमिगत गटार योजनेतील १३० कोटींची कामे,भंडारा नगरपालिका क्षेत्रातील रस्ते ७५ कोटी,बांधकाम विभागाच्या कक्षेतील रस्ते ४० कोटी,डीपीसीतील मंजूर १५ कोटींची विकासकामे,क्रीडा संकुलातील १५ कोटींची विकासकामे तसेच भंडारा ३ आणि पवनीतील २ अशा पाच तलावांचे सौंदर्गीकरण होणार आहे.

