Thursday, May 28, 2026
Homeभंडारामाकडाने घेतला केंद्रीय राखीव दलाच्या जवानाचा जीव..!

माकडाने घेतला केंद्रीय राखीव दलाच्या जवानाचा जीव..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-दुचाकीने बहिणीची भेट घेण्याकरिता निघालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ)जवानाची भेट अधुरी राहिल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात उघडकीस आली आहे.दुचाकीने जात असतांनाच चालत्या दुचाकीवर एका माकडाने उडी मारताच दुचाकी अनियंत्रित होऊन जवान खाली कोसळला.यात गंभीर दुखापत झाल्याने नागपूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.गंभीर मार लागल्याने उपचार सुरू असतांनाच त्यांचा मृत्यू झाला.गणेश ईश्वर वाढीवे वय ३५ वर्षे,रा.हरदोली, ता.तुमसर,जि.भंडारा असे अपघातात मृत पावलेल्या जवानाचे नाव आहे.सदरची घटना काल रविवारी सकाळच्या सुमारास दावेझरी मार्गावर घडली.
गणेश वाढीवे हे केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत आहेत.काही दिवसांपूर्वी ते सुट्टीवर गावी आले होते. त्यांची बहीण आंबागड येथे राहत असल्याने काल रविवारी सकाळच्या सुमारास बहिणीला भेटण्यासाठी दुचाकीने निघाले होते.जात असतांनाच दावेझरी येथे माकडाने चालत्या दुचाकीवर उडी मारली.उडी मारताच गणेश वाढीवे हे दुचाकीसह मुख्य मार्गावर कोसळले. मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,उपचार सुरू असतांनाच त्यांनी शेवटचा श्वास घेतला.गणेश वाढीवे यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,मुलगी,भाऊ आणि बहीण असा आप्त परिवार आहे.घटनेने वाढीवे परिवारावर मोठा आघात झाला असून गणेश वाढीवे यांच्या पार्थिवावर आज,सोमवार १५ सप्टेंबर रोजी हरदोली येथे अंत्यसंस्कार पार पडला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

‘आंबा महोत्सव-२०२६’; गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या आंबा वाणांचे प्रदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे.आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!