- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-भंडाराच्या राष्ट्रीय महामार्गावरील बेला येथील साईप्रसाद हॉटेलसमोर रविवारच्या रात्री
बोलेरो कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला होता.अपघातात पाच पैकी चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला होता.गंभीर जखमी इसमावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.दरम्यान,प्रकृती खालावल्याने पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास त्याला नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यांचा मृत्यू झाला होता👇
अशोक फुलचंद देहरवाल वय ४८ वर्षे,रा.नागपूर,शैलेंद्र लेखाराम बघेल वय ३४ वर्षे,खापरी,नागपूर,शैलेश पन्नालाल गोकुळपुरे वय ४० वर्षे,एअरफोर्स नगर,मुकेश बिंजेवार वय ३२ वर्षे,वाडी,नागपूर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.तर अविनाश नाकतोडे गंभीर जखमी झाला होता.
असा झाला अपघात👇
रायपूरहून आलेले बोलेरो कार वाहन हे नागपूरकडे जात होते.अशातच भंडारा शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या महामार्गावरील
बेला गावाजवळ असलेल्या हॉटेल साई प्रसादमध्ये पाचजण जेवण करण्यासाठी महामार्गावरून वळत असतांना नागपूरकडून भरधाव आलेल्या ट्रकवर आदळले.यात चौघांचा जागीच मृत्यू झाला.तर चालक नाकतोडे गंभीर जखमी झाला होता.काल,सोमवारी सकाळी १० वाजता भंडारा जिल्हा रुग्णालयात चौघांच्याही मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले तसेच मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.
- Advertisement -

