Saturday, August 22, 2026
Homeभंडाराबैल धुण्यासाठी गेला अन् जीव गमावून बसला... - नदीच्या प्रवाहात ५४ वर्षीय...

बैल धुण्यासाठी गेला अन् जीव गमावून बसला… – नदीच्या प्रवाहात ५४ वर्षीय व्यक्ती गेला वाहून..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पाथरी येथील ५४ वर्षीय व्यक्ती बैल धुण्यासाठी गेला असता दुथडी वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना गुरूवारी ८ ऑगस्ट रोजी उघडकीस आली.रूपलाल रामजी वलथरे वय ५४ वर्षे, रा.पाथरी, ता.लाखनी असे नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
रूपलाल हे नदीच्या तीरावर बैल धुत होते.बैल धुता- धुता पलीकडील या तिरावरून पलीकडील तीरावर बैल गेले.त्यांना परत आणण्याकरिता चुलबंद नदीमध्ये उडी घेतली.पोहत जात असताना नदीच्या प्रवाहात रूपलाल वाहून गेले.घटनेच्या ठिकाणी उपस्थित असलेले गावातीलच देवेंद्र कठाणे व धनराज कोरे यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला.मात्र, प्रवाहाच्या वेगामुळे रूपलालचा थांगपत्ता लागला नाही.नदीकाठावर व परिसरात पोलीस,महसूल विभाग व गावकऱ्यांनी शोध घेतला.मात्र,त्याचा थांगपत्ता लागला नाही.बैल धुण्याकरिता नदीत नेले असता ते दुसऱ्या तीरावर गेले.त्यांना माघारी आणण्याच्या नादात रूपलालने पोहत जाऊन नदी पार करण्याचा प्रयत्न केला.मात्र,चूलबंद नदी दुथडी भरून वाहत असून,प्रवाह जोराचा असल्याने रूपलालला दुसऱ्या काठावर जाणे शक्य झाले नाही.त्यामुळे प्रवाहाच्या जोरदार लाटेत रूपलाल वाहून गेला.त्याला तात्काळ कठाणे व कोरे यांनी बांबूच्या साहाय्याने शोधण्याचा प्रयत्न केला.मात्र,अथांग पाण्यात त्याचा थांगपत्ता लागला नाही.लाखांदूर,पवनी व दिघोरी (मोठी) येथील पोलीस स्टेशनला याबाबत सूचना देण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त आज शनिवारी कुरखेडा तालुक्याच्या आंधळी गावातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात...

आता पोलीस दलातून निवृत्त होणारे श्वान राहणार पोलीस दलाचाच भाग..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने पोलीस  दलातून निवृत्त होणाऱ्या श्वानांसाठी अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला आहे.यापुढे १० वर्षे पूर्ण झाल्यानंतर श्वान पोलीस दलाच्या सेवेतून...

घरोघरी जाऊन रेशनचे धान्य खरेदी करणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात.. -दोघांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-घरोघरी जाऊन नागरिकांकडून रेशनचे धान्य खरेदी करणाऱ्या दोघांना पोलिस व पुरवठा शाखेच्या संयुक्त पथकाने दोघांना ताब्यात घेत अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा...

वाढदिवस विशेष..! साधी राहणी,उच्च विचार आणि जनसेवेचा ध्यास- आमदार रामदास मसराम – राजकारण हे सत्तेचे माध्यम नसून जनसेवेचे साधन..

उद्रेक न्युज वृत्त :-शिक्षकी पेशातून समाजसेवेच्या व्यापक क्षेत्रात आणि तेथून लोकप्रतिनिधित्वाची जबाबदारी स्वीकारत जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!