Thursday, August 6, 2026
Homeनवी दिल्लीबेबी केअर रुग्णालयात भीषण आग; ७ नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू...

बेबी केअर रुग्णालयात भीषण आग; ७ नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 नवी दिल्ली :- राजधानी दिल्लीच्या विवेक विहार येथील एका बेबी केअर रुग्णालयात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.या घटनेत ७ नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.ही आग शनिवारी रात्री साडे ११ वाजताच्या जवळपास लागल्याची माहिती आहे.काही क्षणात आगीच्या ज्वाला बाहेरपर्यंत दिसू लागल्या.घटनास्थळी तात्काळ ९ अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या,त्यांनी बेबी केअर रुग्णालयातील बाळांना सुखरुप बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.अग्निशमन दलाच्या जवानांनी १२ बालकांना बाहेर काढले.पण, उपचारादरम्यान त्यापैकी ७ जणांचा मृत्यू झाला तर ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ही आग का लागली याची सध्या काहीही माहिती नाही.

अग्निशमन दलाला  रात्री ११.३० वाजता विवेक विहारच्या ब्लॉक बी,आयटीआयजवळील बेबी केअर सेंटरमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली; त्यानंतर ९ गाड्यांना घटनास्थळी पाठवण्यात आले.बेबी केअर सेंटरच्या बाजुच्या इमारतीतही आग लागली पण सुदैवाने तिथे जिवीतहानी झाली नाही.बेबी केअर सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सिलेंडर असल्याचीही माहिती आहे.यापैकी काही ऑक्सिजन सिलेंडर फुटले देखील.५० मिनिटांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

प्राप्त तक्रारींची दखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पातागुडम-सोमनपल्ली महामार्गाच्या दुरुस्तीला गती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग...

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त...

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

खासगी हॉस्पिटल्सचा संप; रुग्ण सेवा प्रभावित..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी)'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (सीसीएमपी)पूर्ण केलेल्या होमिओपॅथी(बीएचएमएस) डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून वैद्यकीय असंतोषाचा वणवा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!