Saturday, September 26, 2026
Homeगोंदियायुवकाने  मागवला मोबाइल; पण हातात सापडला बेल्ट…

युवकाने  मागवला मोबाइल; पण हातात सापडला बेल्ट…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गोंदिया :- आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाइन व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत.यामध्ये ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.अशातच तालुक्यातील धापेवाडा येथे ऑनलाइनच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.एका युवकाने मोबाइल मागविला असता,त्याच्या हातात पोस्टातील पार्सलमधून चक्क बेल्ट पडला.तथापि,फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने दवनीवाडा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

गोंदिया तालुक्यातील धापेवाडा येथील शिवानंद भोजराज भेलावे या युवकाला एका मोबाइल क्रमांकावरून फोन आला.४ हजार ६०० रुपयांना मोबाइल फोन मिळेल,असे त्यावरून सांगण्यात आले. २१ मे रोजी पोस्ट ऑफिसमार्फत शिवानंद भेलावे याच्या नावाने एक पार्सल आले.सांगितल्यानुसार,चार हजार ६०० रुपये भेलावे याने पोस्ट ऑफिसमध्ये भरले व पार्सल घेतले.नंतर काही क्षणातच पोस्ट ऑफिसमध्येच हे पार्सल उघडून पाहिले असता, त्या पार्सलमध्ये मोबाइल फोन नाही, तर एक बेल्ट (कमरपट्टा) निघाला.यात ऑनलाइन फोनवरून फसवणूक झाल्याची तक्रार भेलावे याने दवनीवाडा पोलिसात केली आहे.

दरम्यान, ठाणेदार सतीश जाधव यांनी शाखा डाकपालास पत्र पाठवून सदर पार्सल आपल्या कोणत्या कार्यालयात,कोणत्या व्यक्तीकडून किंवा कंपनीकडून पाठविण्यात आले,त्यांच्याशी संपर्क करावा व भरणा केलेली रक्कम पुढे पाठवू नये; असे सांगितले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

पोलीस दलात खळबळ; बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्याचा सापडला मृतदेह..!

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस दलात खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार २६ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या...

बस आणि कारची समोरासमोर धडक; बीसीएन न्यूजचे संपादक गंभीर जखमी.. -नागपूरला हलवले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.झालेल्या अपघातात कारमधील बीसीएन न्यूजचे संपादक...

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर.. -पहा संपूर्ण तालुक्यांची यादी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-यंदाच्या एलनिनोच्या प्रभावामुळे राज्याच्या विविध भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते आजपर्यंतच्या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!