Tuesday, August 25, 2026
Homeभंडाराबारच्या तळघरात सुरू असलेल्या देहव्यापार अड्ड्यावर छापा…-अड्डा चालविणाऱ्या सूत्रधाराला पवनी पोलिसांनी केली...

बारच्या तळघरात सुरू असलेल्या देहव्यापार अड्ड्यावर छापा…-अड्डा चालविणाऱ्या सूत्रधाराला पवनी पोलिसांनी केली अटक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

पवनी(भंडारा) :- पवनी येथे हॉटेल विराज बारच्या तळघरात सुरू असलेल्या देह व्यापार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला.येथे आढळलेल्या महिलेकडून देहव्यापार करवून अड्डा चालविणाऱ्या सूत्रधाराला पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल करीत मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई काल,शनिवारी दिनांक-१ जून रोजी करण्यात आली.रूपेश सूर्यभान शेंडे वय ३६ वर्षे,रा.चंडिकामाता मंदिर,शनिवारी वॉर्ड, पवनी असे अटक केलेल्याचे नाव आहे.

भंडारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्तहेराकडून पवनी येथील कोरंभीकडे जाणाऱ्या रोडवरील हॉटेल विराज बारच्या तळघरात देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. गुप्त माहिती वरून पोलिस पथक संबंधित ठिकाणी दाखल झाले.खात्री करण्यासाठी ठरल्याप्रमाणे पंटरला समोर पाठविण्यात आले.त्याने आत गेल्यावर ग्राहक म्हणून सौदा पक्का केल्यानंतर पोलिसांना फोनने माहिती दिली.पोलिस पथकाने हॉटेलच्या मागील बाजूच्या लोखंडी शिड्यांनी तळघरात प्रवेश केला.तेव्हा हॉललगत असलेल्या एका बंद रूममध्ये बनावट ग्राहक व पीडित महिला दिसून आली.

महिला पोलिस अधिकाऱ्याने तिची चौकशी केली. यावर तिने रूपेश शेंडे नावाच्या व्यक्तीने तिला येथे देहविक्री व्यवसायाकरिता आणले असून तो तिच्याद्वारे हा व्यवसाय करून घेत असल्याचे सांगितले.घटनास्थळाची तपासणी करण्यात आली. रूपेश शेंडे याच्याविरूद्ध पवनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर,सहाय्यक पोलिस निरीक्षक केशव पंजरवाड,प्रिती कुळमेथे व सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ कासवांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ भारतीय तारांकित (स्टार)कासवांना महाराष्ट्र वनविभाग आणि 'रेस्क्यूईक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' अर्थात 'रॉ'...

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने...

अचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शहरात भीषण अपघाताची घटना घडून एका २० वर्षीय दुचाकी चालक तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर सहकारी तरुण गंभीर जखमी झाल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!