Thursday, October 15, 2026
Homeअहेरीबाहेर खाटेवर गाढ झोपेत असलेल्या इसमास पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न…-अहेरी तालुक्यातील...

बाहेर खाटेवर गाढ झोपेत असलेल्या इसमास पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न…-अहेरी तालुक्यातील आजची घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

अहेरी(गडचिरोली) :- गडचिरोलीजिल्ह्याच्याअहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथे मध्यरात्री बाहेर खाटेवर गाढ झोपेत असलेल्या चरणदास गजानन चांदेकर वय ४८ वर्षे,रा.छल्लेवाडा,ता.अहेरी यांच्या अंगावर अज्ञात इसमाने पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना आज २ जून रोजी उघडकीस आली आहे.

सध्याच्या घडीला उकाड्याचे दिवस सुरू आहेत. दिवसा तसेच रात्री उष्णतेने अंगाची लाहीलाही होत आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील अनेकजण घरामध्ये उष्णता वाटत असल्याने बाहेर अंगणात खाट टाकून झोपत असतात.मात्र, एखादेवेळेस अनुचित प्रकार घडेल याची साधी कल्पनाही अनेकांना नसते.असाच प्रकार चरणदास यांच्या बाबतीत घडलेला दिसून येत आहे.सायंकाळच्या सुमारास घरातील कुटुंबीय व चरणदास सर्वांनी मिळून जेवण करून उकाड्यामुळे बाहेर अंगणात खाट टाकून झोपी गेले होते.सर्वजण गाढ झोपेत असतांना मध्यरात्री अज्ञात इसमाने चरणदास चांदेकर यांच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावून पळून गेला.चरणदास आगीने होरपळू लागल्याने किंकाळ्या मारू लागला.जवळच झोपलेल्या कुटुंबीयांना जाग आली.तोच कुटुंबीयांनी क्षणाचाही विलंब न लावता आग विझवली.मात्र, चरणदास हे जळाल्याने गंभीर जखमी झाले.परिसरात विचित्र घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणारा ‘तो’ अज्ञात इसम कोण? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन; राज्यात ५० लाखांहून अधिक अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देणाऱ्या महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अधिकाधिक महिलांनी अर्ज करावेत,असे आवाहन आंतरराष्ट्रीय...

अखेर राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांच्या मानधन वितरणाचा मार्ग मोकळा..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम पातळीवर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सहायकांच्या मानधन वितरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून राज्यातील सर्व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!