Wednesday, September 2, 2026
Homeदेसाईगंजबहुजनांचे कल्याण हे फुले-आंबेडकर या गुरू-शिष्यांच्या विचारातच आहे -साहित्यिक प्रा.डाॅ.प्रकाश राठोड ...

बहुजनांचे कल्याण हे फुले-आंबेडकर या गुरू-शिष्यांच्या विचारातच आहे -साहित्यिक प्रा.डाॅ.प्रकाश राठोड – महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीत्सोव संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांना गुरू मानले होते. महात्मा फुले यांच्या समतावादी विचाराने डॉ.आंबेडकर प्रभावित झाले होते.त्यास अनुसरून बाबासाहेबांनी आपल्या कार्याची सुरुवात केली. जातीयता,अस्पृश्यता, भेदाभेद,असमानता,अशिक्षितपणा हे देशाचे खरे शत्रू आहेत.यावर मात करूनच देशाला शक्तीशाली गणराज्य बनविता येवू शकते.असे अलौकिक विचार या गुरू-शिष्यांच्या जोडीने देशाला दिलेत.ते फक्त विचार ठेवूनच थांबले नाहीत तर तशी कृती देखील केली.त्यामुळेच आपला देश आज एका वेगळ्या वळणावर आलेला असला तरी धर्म,जात,पंथ, सांप्रदायिकता,उच्च निचता कमी होण्याचे नावच घेत नाही आहे.अशातून देशाला प्रगतीपथावर न्यायचे असेल तर महापुरुषांनी दिलेले विचार महत्त्वपुर्ण आहेत.यात म.फुले व डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचे अनुसरण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.डाॅ.प्रकाश राठोड यांनी केले.काल,शुक्रवारी १८ एप्रिल रोजी देसाईगंज येथील फव्वारा चौकात राष्ट्रनिर्माते विचारमंचाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंतीत्सोव साजरा करण्यात आला.यातील वैचारिक प्रबोधनाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.दरम्यान प्रमुख वक्ते म्हणून साहित्यिक प्रा.डाॅ.सर्जनादित्य मनोहर नागपूर, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.छायाताई खोब्रागडे व प्रा.शालीनी शहारे मंचावर उपस्थित होत्या.फुले दाम्पत्य जन्माला आले नसते तर कदाचित पुरूषी अहंकाराच्या दास्यत्वातून महिला स्वतंत्र झाली नसती.आज आमच्या सारख्या महिलांनी जी काही भरारी घेतली ती फुले दांपत्याची देण आहे.अशा शब्दांत छाया खोब्रागडे यांनी आपल्या व्याखानाची मांडणी करून अन्य विषयांवर देखील भाष्य केले. सर्जनादित्य खोब्रागडे यांनी जातीच्या समस्या व आरक्षणावरील जातीय उप-वर्गीकरण करणे हा एका कटाचा भाग असल्याचे आपल्या व्याख्यानात नमूद केले.प्रारंभी आंबेडकरी जलसाकार आकाश अंबादे व त्यांच्या कला संचाच्या माध्यमातून जल्लोष भिम-ज्योतीबाचा हा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यानंतर प्रसिद्ध साहित्यिकांच्या माध्यमातून वैचारिक प्रबोधन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओबिसी चळवळीचे प्रबोधनकार प्राचार्य दामोधर शिंगाडे यांनी केले.संचालन गझलकार रमेश बुरबरे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.अनिल होळी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओबिसी,एस.सी., एस.टी.अल्पसंख्याक आणि अठरापगड जातीतील कार्यकर्ते एकत्र आले होते.यातून राष्ट्रनिर्माते विचारमंच तयार झाला.या माध्यमातून सदर कार्यक्रम यशस्वी झाला हे विशेष.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!