Monday, July 13, 2026
Homeचंद्रपूरपोलीसांनी जप्त केले २ लाख; दाखविले ४० हजार- जुगार कायद्यान्वये केली होती...

पोलीसांनी जप्त केले २ लाख; दाखविले ४० हजार- जुगार कायद्यान्वये केली होती कारवाई

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बल्लारपूर येथील पवन भगत यांच्या घरातून ९५ हजार रुपये,तर मोहन तोकलवार यांच्या घरातून १ लाख १० हजार रुपये जप्त केले.पवन व मोहन यांच्यावर जुगार कायद्यान्वये बल्लारपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.परंतु,जप्तीमध्ये केवळ ४० हजार रुपये दाखविण्यात आले; असा आरोप पवन भगत यांनी पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे.

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर स्थानिक गुन्हे शाखा चांगलीच चर्चेत आली होती.चर्चा नमण्यापूर्विच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका कारवाईत जप्त केलेल्या एकूण दोन लाख पाच हजार रोकडपैकी केवळ ४० हजार रुपयेच दाखवले व उर्वरित रक्कम आपसात वाटप केल्याची गंभीर तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे प्रकरणातील आरोपी बल्लारपूर येथील पवन भगत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.त्यांनी चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.

जप्त केलेल्या कारवाईतील रकमेची अफरातफर करून आपापसात वाटप केल्याचा गंभीर आरोप करून शासन दरबारी चुकीची नोंद करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामुळे स्थानिक गुन्हे शाखा चांगलीच अडचणीत आल्याचे बोलले जात आहे.आता चेंडू पोलिस अधीक्षकांच्या कोर्टात गेल्याने ते काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईत अधिक रोकड जप्त करून शासन दरबारी कमी रक्कम दाखवल्याची माहिती होताच जिल्ह्यातील सामाजिक संघटना एकवटल्या आहेत.उलगुलान संघटना,भीम आर्मी, दलित पँथर आदी संघटनांनी एकत्र येत जप्तीच्या कारवाईत हेराफेरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

राज्यात ‘किलकारी’ उपक्रमात वर्धा पहिल्या,चंद्रपूर दुसऱ्या,वाशीम तिसऱ्या तर गडचिरोली चौथ्या स्थानावर..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता,माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता व जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी’(Kilkari Mobile Audio Services)उपक्रमात...

वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी; वाघाची पाठीमागून झडप..

उद्रेक न्युज वृत्त  नागभीड(चंद्रपूर):-गावाजवळच्या परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने प्राणघातक हल्ला चढवून गुराख्यास गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना आज,रविवार १२ जुलै रोजी दुपारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!