Monday, April 27, 2026
Homeभंडारापायी जात असतांना पाठीमागून अज्ञात वाहनाची जोरात धडक; एकजण ठार तर एक...

पायी जात असतांना पाठीमागून अज्ञात वाहनाची जोरात धडक; एकजण ठार तर एक जखमी.. – लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी काळाचा घाला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-नेहमी प्रमाणे दोघेही कामावर गेले होते. काम करून शहरात पोहचले.तिथून घरी जाण्यासाठी दोघेही पायी जात असतांनाच पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहने दोघांनाही जोरात धडक दिली.धडक बसताच एकजण जागीच ठार झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना काल शनिवारी सायंकाळच्या सुमारास साकोली शहराच्या डोये वेल्डिंगजवळ घडली. ३७ वर्षीय पंकज रामू राऊत  असे मृताचे तर ३१ वर्षीय अविनाश हेमराज शहारे वय ३१ वर्षे, दोघेही रा.तलाव वॉर्ड,साकोली असे जखमीचे नाव आहे.
माहितीनुसार,पंकज व अविनाश दोघेही साकोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या पिंपळगाव येथे कामावर गेले होते.काम झाल्यानंतर दोघेही ऑटोने शहराकडे परत येत होते.ऑटो चालकाने बोदरा रोडवर सर्व प्रवाशांना उतरवले.त्यानंतर पंकज राऊत व अविनाश शहारे हे दोघे पायी चालत आपल्या घरी जात होते.तितक्यात डोये वेल्डिंग दुकान नजीक  पाठीमागून आलेल्या वाहने दोघांनाही जोरात धडक दिली.यात पंकज राऊत जागीच ठार झाला. तर अविनाश शहारे हा गंभीर जखमी झाल्याने तात्काळ साकोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे.
  • लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी काळाचा घाला👇
मयत पंकज राऊतचा ज्या दिवशी अपघात घडला, त्याच दिवशी लग्नाचा पहिलाच वाढदिवस होता. म्हणजेच मागील वर्षी बरोबर १२ जुलै २०२४ ला तिरोडा तालुक्यातील मानपुरी येथील तरुणीशी विवाह झाला होता.मात्र,नियतीच्या मनात वेगळेच असल्याने नेमका त्याच दिवशी अपघात घडला.आज,रविवार १३ जुलै रोजी पंकजचा अंत्यसंस्कार पार पडला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता लग्न पत्रिकेवर टाकावी लागणार जन्मतारीख..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात अजूनही विशेषतः ग्रामीण आणि काही दुर्गम भागात छुप्या पद्धतीने बालविवाह लावले जातात.अनेकदा मुलगी अल्पवयीन असतांनाही तिचे लग्न लावून...

उन्हाचा तडाखा; फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरण व ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीच्या वेळेत तात्पुरता बदल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वाढलेल्या उष्माघाताच्या घटनांचा विचार करता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण(फिटनेस सर्टिफिकेट रेनेवल)तसेच पक्की अनुज्ञप्ती(ड्रायव्हिंग लायसन्स)चाचणीच्या...

३० वर्षीय महिलेची दिराने धारदार शस्त्राने गळा चिरून केली हत्या; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात आज,सोमवार २७ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास एक भयावह आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली.नात्यातील दिरासोबत विवाह समारंभासाठी...

शासन निर्णयात जरी पोपट पक्षीचा उल्लेख नसेल; तरीही एखाद्याला नुकसान भरपाईपासून वंचित ठेवता येणार नाही.. – आता पोपट पक्षांनी नुकसान केल्यास मिळणार भरपाई..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकऱ्याने शेतात डाळिंबाची झाडे लावली.पण,अर्ध्याहून अधिकच्या झाडांची फळे ही पोपट पक्षांनी खाऊन नष्ट केली होती.अश्यातच शेतकऱ्याने कृषी विभागास माहिती देऊन पंचनामा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!