Saturday, April 18, 2026
Homeमुंबईपाण्याची टाकी सफाई करतांना बेशुद्ध पडले; चार कामगारांचा मृत्यू..

पाण्याची टाकी सफाई करतांना बेशुद्ध पडले; चार कामगारांचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-पाण्याची टाकी सफाई करण्यासाठी टाकीत उतरलेल्या ५ कामगारांपैकी चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार ९ मार्चला दुपारच्या सुमारास मुंबईतील नागपाडा परिसरातील बिस्मिल्ला स्पेस बिल्डिंगमध्ये उघडकीस आली.हसीपाल शेख वय १९ वर्षे,राजा शेख वय २० वर्षे,झियाउल्ला शेख वय ३६ वर्ष,इमांडू शेख वय ३८ वर्षे अशी मृत झालेल्या कामगारांची नावे आहेत तर पुरहान शेख वय ३१ वर्षे याची प्रकृती बरी आहे.
माहितीनुसार,मुंबईच्या जेजे मार्ग पोलीस ठाण्यांतर्गत बिस्मिल्ला स्पेस नावाच्या बांधकामाधीन इमारतीत भूमिगत असलेल्या पाण्याच्या टाकीत हे पाच जण उतरले होते.टाकीतील साफसफाई करत असतांना त्यांचा श्वास कोंडल्या गेला.त्यामुळे पाचही जण बेशुद्ध पडले.सदरची घटना काही नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी अग्निशमन विभागास माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने त्यांना पाण्याच्या टाकीमधून बाहेर काढण्यात आले.त्यानंतर लगेच त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी अंती चार जणांचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती स्थिर आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!