Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरपाणी पिण्याच्या बहाण्याने युवती सोबत जबरजस्ती करणाऱ्या तरुणास बेड्या..

पाणी पिण्याच्या बहाण्याने युवती सोबत जबरजस्ती करणाऱ्या तरुणास बेड्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-ओळखीच्या संधीचा फायदा घेत पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात गेला आणि जबरजस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.प्रकरणी १९ वर्षीय युवतीच्या तक्रारीवरून २२ वर्षीय आरोपीस हिंगणा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.पीडित युवती ही वर्धा येथील रहिवासी असून सध्या स्थितीत नागपूरच्या हिंगणा परिसरात राहून गुमगाव येथील एका कंपनीत काम करते.त्यातच २२ वर्षीय आरोपी हितेंद्र संतलाल मंडलिये हा भंडारा येथील रहिवासी असून हल्ली त्याचे मुक्काम हिंगणा परिसरात होते.पिडीत युवती व आरोपी दोघेही एकाच कंपनीत काम करायचे.दोघेही सोबत काम करीत असल्यामुळे त्यांची चांगली ओळख होती.दरम्यान,युवती चार दिवसांपूर्वी म्हणजेच मंगळवार १० जून २०२५ रोजी वर्धा येथून बसने हिंगण्याला आली.रात्रीचे १० वाजल्याने व गावाहून सामान घेऊन आल्याने तिने आरोपी हितेंद्रला हिंगणा परिसरातील घरी सोडण्याची विनंती केली.हितेंद्रने दुचाकीवरून घरी सोडले.तेथे त्याने तहान लागल्याची बतावणी केली.त्यामुळे युवती भोळ्या पणात जाऊन पाणी आणण्यासाठी आतमध्ये गेली.तितक्यात आरोपी हितेंद्र हाही आतमध्ये गेला व तेथे त्याने जबरदस्ती करून युवतीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.या प्रकरणी पीडित युवतीच्या तक्रारीवरून हिंगणा पोलीस ठाण्यात हितेंद्र विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.प्रकरणाचा पुढील तपास हिंगणा ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरविंद नाईक करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!