Monday, September 21, 2026
Homeनवी दिल्लीपतीला वेगळ्या खोलीत राहण्यास भाग पाडणे म्हणजे वैवाहिक हक्कांपासून वंचित ठेवणे... -...

पतीला वेगळ्या खोलीत राहण्यास भाग पाडणे म्हणजे वैवाहिक हक्कांपासून वंचित ठेवणे… – घटस्फोटासाठी दाखल केलेला पतीचा अर्ज मंजूर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नवी दिल्ली :-बायकोने नवऱ्याला दुसऱ्या खोलीत राहण्यास भाग पाडणे ही क्रूरताच असल्याचा स्पष्ट निर्वाळा देत अलाहाबाद उच्च न्यायालयाने घटस्फोटासाठी दाखल केलेला पतीचा अर्ज मंजूर केला आहे.पत्नी वेगळ्या खोलीत राहायला लावते.तिच्या खोलीत जाण्याचा प्रयत्न केला तर आत्महत्या करण्याची व खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देते,असे पतीने याचिकेत म्हटले होते.याचिकेवर सुनावणीवेळी न्यायमूर्ती रंजन रॉय आणि न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठाने ही क्रूरता असल्याचे म्हणत घटस्फोट मंजूर केला.
वैवाहिक संबंध संपुष्टात आणण्यासाठी पत्नीने हा प्रकार केला आहे.यात बायको नवऱ्यासोबत एकाच छताखाली राहते की नाही हे कळू शकलेले नाही; मात्र ती नवऱ्याला आपल्या खोलीत शिरू देत नाही; असे म्हणत न्यायालयाने पुढे म्हटले की,सहवास हा वैवाहिक नातेसंबंधात गरजेचा आहे.पत्नीने पतीला वेगळ्या खोलीत राहण्यास भाग पाडले,तर ती त्याला त्याच्या वैवाहिक हक्कांपासून वंचित ठेवत आहे.या गोष्टीचा नवऱ्याच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि ही नवऱ्यासोबत केलेली शारीरिक व मानसिक क्रूरताच आहे.२०१८ मध्ये पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली.सुरुवातीचे ४ ते ५ महिने पत्नीशी संबंध सामान्य होते.पुढे तिने त्रास देणे सुरू केले; असे पतीने म्हटले होते.आधी पत्नी न्यायालयात हजर राहायची; मात्र नंतर समन्स बजावूनही गैरहजर राहू लागली.त्यामुळे याचिकेवर तिची बाजू ऐकून न घेता आदेश दिला होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!