Tuesday, July 28, 2026
Homeदेसाईगंजन्यायालयाने मुख्य आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.. -देसाईगंज शहरातील तरुणीचे अत्याचार...

न्यायालयाने मुख्य आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.. -देसाईगंज शहरातील तरुणीचे अत्याचार प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार रविवार १७ ऑगस्ट २०२५ रोजी देसाईगंज शहरात उघडकीस आला होता.आपली फसवणूक झाल्याचे तरुणीच्या लक्षात येताच तिने संबंध तोडण्याचा प्रयत्न केला असता एका सहकाऱ्याच्या मदतीने तिच्यावर पाळत ठेवून दबाव टाकण्यात आला.प्रकरणी २३ वर्षीय तरुणीने वारंवार होणाऱ्या जाचाला कंटाळून १७ ऑगस्टला देसाईगंज पोलीस ठाणे गाठून देसाईगंज शहरातील नामांकित राधा ज्वेलर्सचे सराफा व्यापारी सुनिल बोके वय ४८ वर्षे,रा.गांधीवार्ड,देसाईगंज व अक्षय कुंदनवार वय ३२ वर्षे रा.मधुबन कॉलनी,देसाईगंज, जि.गडचिरोली यांच्या विरोधात तक्रार नोंदविली होती. त्यानुसार १७ ऑगस्टला दोघांनाही अटक झाली होती. न्यायालयाने त्यांना १९ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती व नंतर दोघांचीही कारागृहात रवानगी करण्यात आली होती.त्यानुसार दोघांनीही गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जावर काल,शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी सत्र न्यायालयात सुनावणी होत वकिलांनी युक्तिवाद केला. त्यानुसार सहआरोपी अक्षय कुंदनवार याची जामिनावर सुटका करण्यात आली.तर प्रकरणातील मुख्य आरोपी याचेवर गंभीर स्वरूपाचे आरोप असल्याने जामीन दिल्यास आरोपी तक्रारदारास धमकावून दबाव निर्माण करू शकतात,त्यामुळे प्रकरणात महिलेला संरक्षण देणे आवश्यक आहे,असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.प्रकरणी सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाने प्रकरणातील मुख्य आरोपी सुनील बोकेचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

हिंदू खाटीक समाजातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज व अनुदान योजनांचा लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या उपकंपनी असलेल्या हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मार्फत हिंदू खाटीक समाजातील पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी विविध...

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी...

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!