Thursday, July 16, 2026
Homeभंडारानुसते पत्र लिहून चालणार नाही तर तुम्हालाही न्याय हक्कासाठी द्यावी लागेल धडक.....

नुसते पत्र लिहून चालणार नाही तर तुम्हालाही न्याय हक्कासाठी द्यावी लागेल धडक.. – धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्यातील धान खरेदीचे उद्दिष्ट अपुरे पडल्याने सुमारे ४० टक्के धान खरेदी केंद्रांवर उघड्यावर पडले आहे.ही समस्या केवळ भंडारा जिल्ह्याचीच नाही,तर संपूर्ण विदर्भाची आहे.गडचिरोली,गोंदिया,चंद्रपूर व इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचीही आहे.त्यामुळे,धान खरेदीचे उद्दिष्ट तात्काळ वाढवावे आणि बोनस जाहीर करावा,शेतकऱ्यांचे संपूर्ण चुकारे विनाविलंब बँक खात्यात जमा करावेत,शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून त्यांना दिलासा द्यावा,आदी मागण्यांसंदर्भात शुक्रवारी भारतीय किसान संघाच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी आणि धान खरेदी केंद्र चालकांनी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.प्रसंगी मागण्यांसाठी प्रशासनाला आठवडाभराचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय महामार्ग रोखले जातील,पणन कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयांना कुलूप लावले जाईल आणि आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.त्यामुळे,काही ठिकाणी नुसते पत्र व्यवहार करून आज होईल उद्या होईल म्हणण्यापेक्षा प्रत्यक्षात कृती करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा 'बी' फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून...

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!