Thursday, July 16, 2026
Homeगडचिरोलीयुद्धाचा भडका; भारतीय दूतावासांकडून २४×७ आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक.. - नागरिकांनी अफवांवर विश्वास...

युद्धाचा भडका; भारतीय दूतावासांकडून २४×७ आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक.. – नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्य-पूर्व व आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा विचार करून परदेशात वास्तव्यास असलेल्या व अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने अत्यावश्यक सूचना जारी केल्या आहेत.त्यानुसार,जिल्हा प्रशासनाकडूनही नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार खात्याने,तसेच विविध भारतीय दूतावासांनी २४×७ आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित केले असून,राज्य शासन या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचे,तसेच दूतावासाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचना व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
  • अफवांवर विश्वास ठेवू नये👇
मध्य-पूर्व व आखाती देशांतील तणावपूर्ण परिस्थितीत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.स्थानिक प्रशासन व भारतीय दूतावासांकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे.सोशल मीडियावरील अप्रमाणित माहिती प्रसारित करू नये,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
  • राज्य आपत्कालीन कार्यकेंद्र(एसईओसी)२४×७ सुरु👇
परदेशात अडकलेल्या नागरिकांबाबत माहिती देण्यासाठी अथवा आपत्कालीन मदतीसाठी राज्य आत्पकालीन कार्य केंद्र २४×७ सुरु राहणार आहे.  नागरिकांनी फोन-१०७७ (टोल फ्री)फोन  +९१-९३२१५८७१४३ दूरध्वनी : ०२२-२२०२७९९० ई-मेल : controlroom@gov.in यावर संपर्क साधावा.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालय गल्फ व मध्य-पूर्व देशांतील भारतीय दूतावासांचे देशनिहाय आपत्कालीन संपर्क क्रमांक-कतार (दोहा)फोन : ००९७४-५५६४७५०२ / ००९७४-५५६४७५०३, ई-मेल : cons.doha@mea.gov.in
संयुक्त अरब अमिरात (अबूधाबी/दुबई)–टोल फ्री : ८००-४६३४२, व्हॉट्सॲप : +९७१-५४३०९०५७१, ई-मेल : pbsk.dubai@mea.gov.in, ई-मेल : ca.abudhabi@mea.gov.in
सौदी अरेबिया (रियाध / जेद्दाह) – फोन : ००-९६६-११-४८८४६९७, व्हॉट्सॲप (फक्त) : ००-९६६-५४२१२६७४८, टोल फ्री : ८००-२४७-१२३४, ई-मेल : cw.riyadh@mea.gov.in
बहरीन (मनामा) – फोन : ००९७३-३९४१८०७१
कुवैत फोन : +९६५-६५५०१९४६ (२४×७ आपत्कालीन), ई-मेल : community.kuwait@mea.gov.in
ओमान (मस्कत)- कम्युनिटी टोल फ्री : ८००७१२३४, व्हॉट्सॲप : +९६८-९३५७७९७९,
कॉन्सुलर हेल्पलाईन : २४६९५९८१
इराण (तेहरान)- फोन : +९८-९१२-८१०-९११५, फोन : +९८-९१२-८१०-९१०९, फोन : +९८-९१२-८१०-९१०२,
फोन : +९८-९९३-२१७-९३५९
इस्रायल (तेल अवीव)-  फोन : +९७२-५४-७५२०७११, फोन : +९७२-५४-२४२८३७८, ई-मेल : cons1.telaviv@mea.gov.in
जॉर्डन (अम्मान)-  फोन : ००९६२-७७०४२२२७६ (तातडीने देश सोडण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे)
पॅलेस्टाईन (रामल्लाह)- फोन : +९७०-५९२९१६४१८, ई-मेल : repoffice@mea.gov.in
  • परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना👇
सुरक्षित ठिकाणीच वास्तव्यास राहावे व अनावश्यक हालचाल टाळावी.
भारतीय दूतावास व वाणिज्य दूतावासांच्या अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करावे.
आपले सध्याचे लोकेशन व परिस्थिती कुटुंबीयांना नियमित कळवावी मोबाईल फोन पूर्ण चार्ज ठेवावा व आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगावीत.
सोशल मीडियावरील अफवा व अप्रमाणित माहिती प्रसारित करू नये.
संबंधित दूतावासाकडे नोंदणी करणे अत्यावश्यक आहे.
महाराष्ट्र शासन व भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय संयुक्तपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आवश्यकतेनुसार स्थलांतर(Evacuation) प्रक्रियेची तयारी सुरू असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राकडून देण्यात आली आहे.
नागरिकांनी शांतता राखून अधिकृत सूचनांची प्रतीक्षा करावी,तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे (मोबाईल क्रमांक-8668383300) यांचेशी संपर्क करावा,असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा 'बी' फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून...

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!