Saturday, April 18, 2026
Homeनागपूरस्फोटके बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगारांचा मृत्यू.. - शरीर जळून खाक;...

स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगारांचा मृत्यू.. – शरीर जळून खाक; मृतांची ओळख पटवणे कठीण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट होऊन आतापर्यंत तब्बल १७ कामगारांचा मृत्यू झाला, तर २४ कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना आज, रविवार १ मार्च रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास काटोल तालुक्याच्या राऊळगाव जवळील एसबीएल कंपनीत घडली.स्फोट इतका भीषण होता की, कामगारांचे संपूर्ण शरीर जळून खाक झाले आहेत. त्यामुळे मृतांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. अश्यातच आता प्रशासनाने सर्व मृतांची डीएनए प्रोफाइलिंग चाचणी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी अनेक कामगारांच्या नातेवाईकांचे रक्ताचे नमुने घेण्यात येत आहेत.डीएनए प्रोफाइलिंग चाचणी दोन दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे.तोपर्यंत सर्व मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या शीतगृहात ठेवण्यात येणार आहेत.यामध्ये जखमी झालेल्या कामगारांवर नागपुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर सर्व मृत कामगारांचे पार्थिव वैद्यकीय आणि उत्तरीय  तपासणीसाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णवाहिकेद्वारे नेण्यात आले आहेत. दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुःख व्यक्त केले आहे.जखमींवर तातडीने उपचार करण्यात यावेत, असे आदेशही देण्यात आले आहेत.
आज रविवारी सकाळी सातच्या सुमारास राऊळगाव जवळील एसबीएल या स्फोटक बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट झाला.कंपनीच्या खाणींमध्ये खोदकामासाठी लागणारी डिटोनेटर,स्लरी एक्सप्लोसिव,कास्ट बूस्टर, सिस्मिक एक्सप्लोसिव्स आणि इतर स्फोटके बनवली जातात.सकाळच्या सुमारास कामगार डिटोनेटर बनवण्याची प्रक्रिया करत असतांना अचानक मोठा स्फोट झाला.या स्फोटामुळे आसपासच्या भागातील घरांनाही हादरे बसले. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की कंपनीचा परिसर अक्षरशः उद्ध्वस्त झाला. आवाज आजूबाजूच्या गावतही गेला.स्फोटाची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने धाव घेतली. पण तोपर्यंत अनेक कामगारांना आपला जीव गमवावा लागला.विशेष म्हणजे,कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये महिलांची संख्या जास्त होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!