Tuesday, September 1, 2026
Homeनागपूरवनविभागाला पगार मिळतो; आम्ही शेतात गेलो नाही तर जगायचे कसे? - वाघाने...

वनविभागाला पगार मिळतो; आम्ही शेतात गेलो नाही तर जगायचे कसे? – वाघाने बैलाला बैलबंडीसह फरफटत नेत शेततळ्यात केले ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सध्याच्या घडीला सर्वत्र मानव-वन्यजिव संघर्ष शिगेला पोहोचला आहे.नागपूर जिल्ह्यासह विविध जिल्ह्यात हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात शेकडो नागरिकांनी जीव गमावून कुणाचा आधारवड गेला तर,कुणाचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडल्याचे चित्र आहे.अश्यातच काही ठिकाणी वनविभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांना संरक्षण देण्या ऐवजी शेतात जाऊ नका,असा सल्ला देत आहेत. यावर शेतकरी संतप्त झाले आहेत.वनविभागाला पगार मिळतो आहे; आम्ही शेतात गेलो नाही तर जगायचे कसे?पिके वाळून जात आहेत.जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. आम्ही काय आता भीक मागायची कां?असा सवाल बसंती कोडवते आणि दुर्गेश कोडवते या शेतकरी मायलेकांनी उपस्थित केला आहे.नागपूर
जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील देवलापार वनपरिक्षेत्रात वाघाने उच्छाद मांडला असून,नवेगाव येथील एका घटनेने शेतकरी हादरले आहेत.४७ वर्षीय बिरन मंगलू कोडवते यांच्या शेतात बांधलेल्या बैलावर वाघाने भीषण हल्ला केला.विशेष म्हणजे,वाघाने बैलाला बैलबंडीसह फरफटत नेत शेततळ्यात ठार केले.या घटनेमुळे आदिवासी भागातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.वाघाच्या सततच्या वावरामुळे नवेगाव,वडंबा परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात जाणे बंद केले आहे.यामुळे तूर,शेंगा यांसारखी उभी पिके वाळत असून मोठे आर्थिक नुकसान होत आहे.पाण्याचे पाइप फुटले असून त्याची भरपाई देणार कोण?असा प्रश्न उभा ठाकला आहे.केवळ बैठकांचा फार्स न करता, वनविभागाने वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा,अशी मागणी लालसिंग उईके यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!