Wednesday, October 28, 2026
Homeभंडारानाना पटोले यांच्याबद्दल नगरसेवकाकडून अश्लील भाषेचा वापर प्रकरणी पोलिसांत तक्रार..

नाना पटोले यांच्याबद्दल नगरसेवकाकडून अश्लील भाषेचा वापर प्रकरणी पोलिसांत तक्रार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच हाती आले आहेत.निकालादरम्यान जयपराजयामुळे कुठे उत्साह तर कुठे नाराजीचे वातावरण आहे. अशातच राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे लाखनी येथील एका नगरसेवकाने भाजपा जिल्हाध्यक्षांशी मोबाइलवर संवाद साधतांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा नवनिर्वाचित आमदार नाना पटोले यांच्याबद्दल शिवराळ भाषेचा प्रयोग केल्याने राजकीय वर्तुळात वातावरण तापले आहे.काँग्रेसचे लाखनी तालुकाध्यक्ष योगराज झलके यांनी याबाबत कार्यकर्त्यांसह लाखनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.यावर पोलिसांकडून काय कारवाई केली जाते,याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
सदर नगरसेवकाने भाजपा जिल्हाध्यक्ष यांना शनिवारी २३ नोव्हेंबरच्या रोजी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास,मोबाइलवर संपर्क साधला होता.यावेळी जिल्हाध्यक्षांनी निवडून आल्याबद्दल आ.नाना पटोले यांचे अभिनंदन करायला हवे,असे विचार मांडले. दरम्यान,बातचीत करतांना नाना पटोले यांच्याबद्दल नगरसेवकाने अपमानजनक अश्लील भाषेचा वापर केला.या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने जिल्ह्यासह लाखनी तालुक्यात काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.या घटनेची दखल घेत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगराज झलके यांच्या मार्गदर्शनात शंभरहून अधिक नाराज कार्यकर्त्यांनी काल सोमवारी लाखनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
या प्रकारामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहे.सर्वत्र मोबाइलची कॉल रेकॉर्डिंग वायरल झाली आहे.एकंदरीत,आमदार नाना पटोले पटोले यांची प्रतिमा मलीन करण्याचा तर हा डाव नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.या घटनेचा काँग्रेसने तीव्र निषेध केला आहे.संवादाची रेकॉर्डिंग एका पेन ड्राइव्ह मध्ये घेऊन पोलिसांना सोपविण्यात आली असून लाखनी पोलिसांकडून काय कारवाई केली जाते.याकडे तालुक्यासह जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पंतप्रधानांच्या हस्ते ‘पीएम किसान’च्या २४ व्या हप्त्याचे वितरण; पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये होणार जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अर्थात ‘पीएम किसान’ योजनेच्या २४ व्या हप्त्याचे वितरण येत्या,शुक्रवार ३० ऑक्टोंबर २०२६ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

पंतप्रधानांच्या हस्ते ‘पीएम किसान’च्या २४ व्या हप्त्याचे वितरण; पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये होणार जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अर्थात ‘पीएम किसान’ योजनेच्या २४ व्या हप्त्याचे वितरण येत्या,शुक्रवार ३० ऑक्टोंबर २०२६ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून माजी प्राध्यापकाची केली हत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोथली गावनजीक एका माजी प्राध्यापकाची अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून हत्या केल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ...

चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीत..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही येत्या,२१ फेब्रुवारी २०२७ रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!