Wednesday, July 29, 2026
Homeचंद्रपूरनऊ वर्षीय विद्यार्थ्यांचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला...

नऊ वर्षीय विद्यार्थ्यांचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-नायलॉन मांजा किती घातक असते,याची प्रचिती चंद्रपूर शहरात काल रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.किराणा दुकानात सायकलने जाणाऱ्या तिसऱ्या वर्गातील नऊ वर्षीय विद्यार्थ्यांचा गळा नायलॉन मांजाने कापला असल्याची घटना चंद्रपूर शहराच्या वृंदावननगर परिसरात काल, रविवारी ५ जानेवारीला सकाळच्या सुमारास घडली. गळा कापलेल्या अवस्थेतच त्याला जवळच्या रुग्णालयामध्ये त्वरित नेण्यात आले.वेळीच उपचार झाल्याने सुदैवाने त्याचा जीव वाचला.साई जंपलवार वय ९ वर्षे असे मांजाने जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.घडलेल्या घटनेने ‘नायलॉन मांजा’ची घातकता पुन्हा एकदा सर्वांसमोर आली आहे. जंपलवार हा वृंदावननगर येथील रहिवासी असून लोकमान्य टिळक ज्ञान मंदिरामध्ये तिसऱ्या वर्गात शिकतो.काल रविवारी सकाळच्या सुमारास तो सायकलने दुकानात जाण्यासाठी निघाला.काही अंतरावरच अचानक नायलॉन मांजा त्याच्या मानेला चिरून गेला.अचानक गळा कापल्याने त्याला काही सुचेनासे झाले.परिसरातील नागरिकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेले.तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले.या घटनेमुळे ‘नायलॉन मांजा’ची घातकता पुन्हा एकदा पुढे आली आहे.त्यामुळे प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन कायमस्वरुपी बंदी घालावी; अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.नायलॉन मांजामुळे मुलाचा गळा कापला गेला. पण,डॉक्टरांमुळे त्याला जीवदान मिळाले.पतंग उडविणाऱ्यांनो नायलॉन मांजाने पतंग उडवू नका. साध्या दोराने उडवा,पतंग विकत घेता येतो,पण गेलेला जीव परत येत नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!