उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज शहराच्या ब्रम्हपुरी मार्गे असलेल्या जामा मस्जिद नजिक अम्मा क्लिनीकचे शुभारंभ नुकतेच ब्रम्हपुरी येथील स्त्रीरोगतज्ञ डॉ.म्हैसकर आणि देसाईगंज ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.इकबाल बेग यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
अम्मा सर्व सोयीसुविधायुक्त असून क्लिनीक मध्ये वातरोग,लकवा रोग,दमा,फिटल डॉप्लर,त्वचा रोग, पोटाचे विकार,स्त्रीरोग, मुळव्याध, वृद्धपणाचे आजार, मधुमेह व रक्तदाब,नेबुलाईजेशन व ऑक्सीजन, कान,नाक,घसा तपासणी,गरोदर माता तपासणी,ईसीजी व इतर उपचारची सुविधा उपलब्ध होणार आहे.विशेष म्हणजे अम्मा क्लिनीक मध्ये स्त्रीरोग तज्ञासह एम.बी.बी.एस.ते एम.डी.सारख्या प्रशिक्षीत डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे.यात डॉ. सफाक शेख,डॉ.पुजा वंजारी,डॉ.प्रसन्ना मुन,डॉ. शफिक शेख,डॉ.राहुल राऊत, डॉ.झरीन इकबाल बेग आदींची प्राक्टीस नियमीत राहणार आहे.
शुभारंभ प्रसंगी प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष जेसा मोटवाणी,मनोहर डांगे,काँग्रेस नेते रामदास मसराम, डॉ.साजीद शेख गोंदिया,मोनटी छिंदवाडा,इंजि.विजय मेश्राम आदी उपस्थित होते.

