Tuesday, September 22, 2026
Homeकोंढाळामृतकाचे वारसास अवघ्या चार दिवसांतच ४ लाखाचे धनादेश वितरीत…-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे...

मृतकाचे वारसास अवघ्या चार दिवसांतच ४ लाखाचे धनादेश वितरीत…-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे आठ वर्षीय मुलाचा गावतलावात बुडून झाला होता मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कोंढाळा(देसाईगंज) :-नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या मृतकाच्या वारसास अवघ्या चार दिवसांतच ४ लाखाचे धनादेश आज, दिनांक-२४ जुलै ला सायंकाळच्या सुमारास तालुका आपत्ती व्यवस्थापन देसाईगंजच्या तहसीलदार प्रीती डूडूलकर तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

देसाईगंज तालुक्याच्याकोंढाळा येथील एका आठ वर्षीय मुलाचा गावतलावात मागील आठवड्याच्या शनिवार,दिनांक-२० जुलै रोजी बुडून मृत्यू झाला होता.वंश विजय भुते वय ८ वर्षे व घरा शेजारील तीन ते चार अल्पवयीन मुले त्यादिवशी दुपारच्या सुमारास गावालगत असलेल्या गावतळ्यात मासे पकडण्यासाठी गेले होते.काहीकाळ झाल्यानंतर सोबत असलेली मुले घरी परतली.मात्र,वंश हा एकटाच तलावाजवळ होता.अशातच गावातील काही नागरिक सतत पडणाऱ्या पावसामुळे गावतळा पाण्याने किती भरलेला आहे; हे पाहण्याकरिता गेले असता,तलावात एक मुलगा तरंगतांना दिसून आला होता.त्यातच तलावाजवळील पारीवर शालेय गणवेश आढळून आला होता.सदरची माहिती गावातील पोलीस पाटील किरणताई कुंभलवार यांना देण्यात आली होती.त्यानंतर पाण्यावर तरंगणाऱ्या मुलाला बाहेर काढले असता,त्याची ओळख पटली होती. त्यानुसार देसाईगंज तालुका आपत्ती व्यवस्थापन यांनी प्रकरणाची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करीत आज प्रत्यक्ष घरी जाऊन मृत मुलाचे वारस वडील विजय केवळराम भुते यांना आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या उपस्थितीत शासकीय मदतीची रक्कम ४ लाख रुपये धनादेशाद्वारे वितरीत करण्यात आली.

धनादेश वितरीत करतेवेळी आमदार कृष्णा गजबे, गावच्या प्रथम नागरिक सरपंचा अपर्णा नितीन राऊत, पोलीस पाटील किरणताई कुंभलवार,देसाईगंज तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून एन.एम. सुरपाम,एस.जी.वलथरे,देसाईगंज भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पारधी,ग्रामपंचायत सदस्य संदीप वाघाडे,शेषराव नागमोती,गोकुल ठाकरे,सामाजिक कार्यकर्ते अरूण कुंभलवार,पत्रकार नितेश पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!