- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रचाराचा धुराळा उडाला आहे.प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेस पक्ष आघाडीवर असून प्रत्यक्ष भेटी,जनतेशी थेट संवाद, समस्यांची जाण आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी त्यांचा लेखाजोखा तयार केला आहे.त्यातच,प्रचार सभांच्या माध्यमातून जनतेशी जुळलेली नाळ आणि जनतेशी साधलेला थेट संवाद यास विशेष महत्व असल्याने काल शनिवारी देसाईगंज शहरात सभेचे आयोजन करण्यात आले होते.सभेस माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेसह बेधुंदकार वक्ते गोविंद पोलाड,आमदार मसराम तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सभा पार पडली.देसाईगंज नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या भव्य जाहीर सभेत माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रचंड उत्साहाने विजयाचा हुंकार भरला.सभेला उसळलेल्या अफाट गर्दीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.सभेत विजय वडेट्टीवार म्हणाले की, “देसाईगंज नगर परिषदेत यंदा निश्चितपणे काँग्रेसची सत्ता स्थापन होणार आहे आणि वनिता नाकतोडे नगराध्यक्ष होतील,ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.”

वनिता नाकतोडेंचा नगराध्यक्षपदाचा मार्ग सुकर👇
काँग्रेसने घोषित केलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वनिता नाकतोडे यांना प्रचंड लोकसमर्थन लाभत असून,सभेतील उपस्थितीवरून नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास दाखविल्याचे चित्र स्पष्टपणे जाणवत होते. महिला विकास,स्वच्छता,पाणीपुरवठा व सर्वसमावेशक शहर विकासाचा ठोस आराखडा जाहीर करून त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह आणखी वाढवला.
आमदार रामदास मसराम यांचे दमदार मार्गदर्शन👇
सभेत आमदार रामदास मसराम यांनीही पक्षाच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा देत नागरिकांशी थेट संवाद साधला.ते म्हणाले, “देसाईगंज शहराला विकासाची नवी दिशा देण्यासाठी काँग्रेसची सत्ता आवश्यक आहे.पक्ष कार्यकर्त्यांची एकजूट आणि नागरिकांचा विश्वास हीच आमची ताकद आहे.”
गोविंद पोलाड यांचे तडफदार भाषण👇
बेधुंदकार वक्ते गोविंद पोलाड यांनीही कार्यकर्त्यांना एकत्र येऊन विजय निश्चित करण्याचे आवाहन केले. त्यांच्या दमदार भाषणाने वातावरणात आणखी जोश भरला.
सभेला उसळलेली अफाट गर्दी-काँग्रेसच्या लाटेची चाहूल👇
संपूर्ण सभास्थळी पहिला ते शेवटचा रस्ता गर्दीने फुलून गेला होता.युवक,महिला,ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच स्तरातील लोकांच्या उपस्थितीमुळे काँग्रेसकडे लोकमत झुकत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले.
देसाईगंज नगर परिषदेसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह,नेत्यांचे मार्गदर्शन आणि उमेदवारांवरील विश्वास पाहता आगामी निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आणि वनिता नाकतोडे यांचे नगराध्यक्षपद निश्चित असल्याचे चित्र अधोरेखित होत आहे.

- Advertisement -

