Wednesday, June 24, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई द्या - आम आदमी...

देसाईगंज तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई द्या – आम आदमी पार्टी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- तालुक्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे झालेल्या शेत मालांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई  देण्याची यावी; यासाठी आपचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जीवानी व उपस्थित आपच्या पदाधिकऱ्यांनी देसाईगंज तहसीलदार यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदाद्वारे मागणी केली आहे.

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे अनेक शेतकरी बांधवांच्या शेतमालाचे नुकसान झाले आहे.१८ मार्च ते २० मार्च २०२३ रोजी जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गारपीट व अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.अशातच देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील शेत माल शेतातच सापडल्याने शेतमालाचे नुकसान झाले आहे.अशातच भाजी पाला,कडधान्य,मका,चना,ज्वारी व इतर अश्या अनेक प्रकारच्या शेत मालाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा अवकाळी पावसामुळे नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे  त्वरित पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई  देण्यात यावी; अशा मागणीचे निवेदन देसाईगंज आम आदमी पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे.

निवेदन सादर करतेवेळी देसाईगंज आम आदमी पक्षाचे  तालुकाध्यक्ष भरत दहलानी, शहराध्यक्ष आशिष घुटके,महिला शहराध्यक्षा शिल्पा बोरकर,  देवा जांभूळकर,शेखर बारापात्रे,तबरेज खान व इतर आपचे कार्यकर्ते उपस्थित  होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!