Tuesday, August 11, 2026
Homeभंडारादुर्दैवी घटना; अस्वलाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू..

दुर्दैवी घटना; अस्वलाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जंगल परिसरात गुरे चराईसाठी गेलेल्या गुराख्यावर अचानकपणे हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना काल सोमवारी भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील वन विभागाच्या सानगडी(पूर्व) उपवन क्षेत्रातील पापडा बिटात घडली होती.अस्वलाच्या हल्ल्यात दौलत मणिराम राऊत वय ५५ वर्षे,रा.सोनका (पळसगाव),ता.साकोली,जि.भंडारा हे गंभीर जखमी झाल्याने प्रथमोपचारानंतर त्यांना नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दौलत राऊत हे गुरे चारण्यासाठी जंगल परिसरात गेले असता दुपारच्या सुमारास दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक हल्ला चढविला.परिसरात असलेल्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत अस्वलाला हुसकावून लावले.घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन कटरे,वन क्षेत्र सहाय्यक गुरबेले,खंडागळे,वनरक्षक आशिष तूरकर, एस.एन.मेश्राम,गजभिये पथकासह घटनास्थळी दाखल झाले.पंचनामा करून घटनेचा आढावा घेऊन हल्ल्यातील जखमी दौलत राऊत यांना तात्काळ साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.तिथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना भंडारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नागपूर मेडिकलमध्ये हलविण्यात आले. मात्र,उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेली सर्पदंशाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा...

अचानक विजांचा लखलखाट; विज कोसळून महिलेचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील राजुली जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या उत्तरा उत्तम थेर वय ४७ वर्षे या महिला गुराखीचा वीज कोसळून...

सर्पदंशग्रस्त चिमुकलीला नागपूरला हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या कुमारी दीपिका बिलकुरासाय मडावी वय ११ वर्षे हिला पुढील उपचारासाठी जिल्हा प्रशासनाने...

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!