Thursday, September 3, 2026
Homeचंद्रपूरदलालाच्या जाचाला कंटाळून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उपोषणाचा घेतला पावित्रा - कोरपना तालुक्यातील परसोडा येथील...

दलालाच्या जाचाला कंटाळून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उपोषणाचा घेतला पावित्रा – कोरपना तालुक्यातील परसोडा येथील शेतकरी बांधव

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नितेश केराम/ कोरपना ता.प्र.

चंद्रपूर :- जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागातील परसोडा येथील प्रकल्प ग्रस्त शेतकरी बांधवांच्या जमीनी दलाला मार्फत अवैधरित्या खरेदी केली जात आहेत. दलालांच्या मार्फतीने शेत्या खरेदी केल्या जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.अशातच दलालांच्या जाचाला कंटाळून अखेर प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांनी काल ४ एप्रिल २०२३ पासून परसोडा गावा नजिक मुख्य मार्गालगत उपोषणाचा पावित्रा घेतला आहे.

उपोषणाचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतजमीनी कवडीमोल भावाने खरेदी करणाऱ्या दलालांवर कार्यवाही करण्यात यावी व गुन्हे दाखल करून अशांचा बंदोबस्त करण्यात यावा; अशी मागणी प्रकल्प ग्रस्त शेतकरी बांधवांनी केली आहे.

सदर उपोषणस्थळी खुशालभाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर यांनी भेट दिली असता शेतकऱ्यांनी आपबिती कथन केली.खुशालभाऊ बोंडे लोकसभा विस्तारक यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय खपवून घेतला जाणार नाही व वरिष्ठांच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु; असे आश्वासन दिले.भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून न्याय मिळवून देणार असल्याचेही यावेळी सांगितले आहे.

उपोषणस्थळी शेतकरी बांधवांच्या समस्या व सदर प्रकारावर आळा घातला जाणार प्रसंगी नारायण हिवरकर भाजपा तालुकाध्यक्ष कोरपना,राजुभाऊ घरोटे किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष,सतीशभाऊ उपलंचिवार शहराध्यक्ष गडचांदुर,शिवाजी भाऊ सेलोकर जेष्ठ नेते,किशोर बावणे जिल्हा सहकार आघाडी प्रमुख,अरुण भाऊ मडावी माजी सरपंच, किशोर बावणे जिल्हा सहकार आघाडी प्रमुख,अमोल आसेकर माजी नगरसेवक,विजय रणदिवे माजी सरपंच,ओम पवार उपसरपंच,मनोज तुमराम उपसरपंच,कार्तिक गोंडलावार,रामलु भाऊ भाजपा तालुका पदाधिकारी,शेतकरी बांधव,गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!