Friday, October 16, 2026
Homeनवी दिल्लीतुम्हाला माहिती आहे कां?..फाशी दिलेल्या दोराचे जल्लाद काय करतात?

तुम्हाला माहिती आहे कां?..फाशी दिलेल्या दोराचे जल्लाद काय करतात?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नवी दिल्ली :- दुर्मीळ गंभीर गुन्ह्यात फाशीची शिक्षा दिली जाते.मात्र फाशी दिल्यानंतर त्या दोराचे नक्की काय केले जाते, याची माहिती बहुतेकांना नसते.विशेष म्हणजे फाशीसाठी वापरल्या गेलेल्या दोरासंदर्भात अनेक अंधविश्वास प्रचलित आहेत.

ब्रिटनमध्ये १९६५ पासून फाशीवर बंदी आहे.मात्र त्यापूर्वी शिक्षा दिली जात असे तेव्हा तेथील जल्लाद या दोराचे छोटे छोटे तुकडे करून ते विकत असत आणि लोक ते आनंदाने खरेदी करत असत.कारण ब्रिटनमध्ये असा समज होता की,फाशी देण्यासाठी वापरलेल्या दोराचे तुकडे घरात ठेवले किंवा लॉकेटमध्ये घातले तर माणसाचे नशीब फळफळते. फाशी दिलेला दोर जल्लादलाच दिला जात असे. कोलकाता येथील जल्लाद नाटा मल्लीक यानेही फाशीच्या दोराचे तुकडे लॉकेटमध्ये घालून त्याची विक्री करून अमाप पैसा मिळवला होता.

२००४ मध्ये त्याने रेप व मर्डरचा दोषी ठरलेल्या धनंजय चटर्जी याला फासावर लटकवल्यानंतर त्या दोराचे लॉकेट बनवून प्रत्येकी दोन हजार रुपयांना विकले होते.बंगालमध्येही फाशी दोराबाबत ब्रिटनसारखाच समज होता.काही वेळा मात्र असे दोर जाळले जातात.एखाद्या फारच विवादित अथवा दहशतवाद्याला फाशी दिली असेल तर तो दोर मात्र ताबडतोब नष्ट केला जातो,असेही सांगितले जाते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!