Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरतीन वर्षीय चिमुकल्यावर काळाचा घाला; ई-रिक्षात बसून खेळत असतांना रिक्षा उलटला..

तीन वर्षीय चिमुकल्यावर काळाचा घाला; ई-रिक्षात बसून खेळत असतांना रिक्षा उलटला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-घराचे बांधकामाकरिता साहित्य घेऊन आलेल्या ई-रिक्षाने क्षणात हसत्या-खेळत्या परिवारावर मोठा आघात करून सोडला आहे.तीन वर्षीय चिमुकला ई-रिक्षात बसून खेळत असतांना अचानकपणे ई-रिक्षा चालू होऊन काही अंतरावर गेला आणि उलटला.यात चिमुकल्याचा डोक्याला गंभीर मार लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिडगाव येथील आराधना नगरात शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.
दिव्यांश सुनील लिल्लारे वय ३ वर्षे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.दिव्यांशचे वडील सुनील कारुलाल लिल्लारे यांच्या शेजारीच त्यांची बहीण राहते.बहिणीच्या घराचे बांधकाम सुरु असल्याने सुनील यांनी शुक्रवारी दुपारी ई-रिक्षामध्ये सिमेंटचे चौकट आणले होते.सिमेंटचे चौकट काढत असतांना त्यांचा तीन वर्षाचा चिमुकला दिव्यांश हा ई-रिक्षात बसून खेळत होता.खेळत असतांना अचानक ई-रिक्षा सुरु होऊन काही अंतरावर जाऊन बाजूला उलटला.यात दिव्यांशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी वाठोडा पोलिस ठाण्याचे पीएसआय सागर गायकवाड यांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरु केला आहे.तीन वर्षीय चिमुकल्याच्या जाण्याने लिल्लारे कुटुंबियांना तीव्र मानसिक धक्का बसून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.कुटुंबात आई,वडील व आठ वर्षाचा मोठा भाऊ आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!