Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनक्षलवाद्यांना पावसाळ्यातही शांत झोपू दिले जाणार नाही- अमित शाह

नक्षलवाद्यांना पावसाळ्यातही शांत झोपू दिले जाणार नाही- अमित शाह

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नक्षलवाद जो पर्यंत संपुष्टात येणार नाही,तोपर्यंत शांत बसणार नाही.देशातून नक्षलवाद्यांचा पूर्णपणे नायनाट करणे,हे सरकारचे ध्येय आहे.या दिशेने केंद्र आणि राज्य सरकार वेगाने काम करत आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की,पूर्वी नक्षलवादी पावसाचा फायदा घेऊन जंगलात लपून बसायचे,परंतु आता असे होणार नाही. नक्षलवाद्यांना पावसाळ्यातही शांत झोपू दिले जाणार नाही.नक्षलवादाविरुद्धची कारवाई पावसातही सुरुच राहील.ही कारवाई कोणत्याही हवामानावर अवलंबून राहणार नाही.आमचे सुरक्षा दल पूर्ण ताकदीने काम करत आहेत आणि ही लढाई निर्णायक वळणावर पोहोचली आहे.त्यांनी स्पष्टपणे सांगितले की नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवत आत्मसमर्पण करावे.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातून नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंतची तारीख निश्चित केली आहे.या दिशेने नक्षलग्रस्त भागात तीव्र मोहिमा राबवल्या जात आहेत. छत्तीसगडमधील एका कार्यक्रमात बोलतांना शाह म्हणाले की,नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून देशाच्या विकास प्रवासात भागीदार व्हावे.ज्यामुळे मुख्य प्रवाहात परतणाऱ्यांना चांगले भविष्य आणि सन्माननीय जीवन जगण्याची संधी मिळेल.अन्यथा समूळ उच्चाटन केल्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!