Thursday, May 28, 2026
Homeभंडारातीन दिवसांपूर्वी मामाच्या घरून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह आढळला विहिरीत.. - आईविना...

तीन दिवसांपूर्वी मामाच्या घरून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह आढळला विहिरीत.. – आईविना दोन चिमुकले पोरकी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील अड्याळ पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या फनुली गावातील विहिरीत तीन दिवसांपूर्वी मामाच्या घरून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.मयुरी अतुल सेलोटे वय २८ वर्षे, रा.कातुर्ली,ता.पवनी असे मृतक महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे,पंधरा दिवसांपूर्वी मयुरी व तिच्या पतीचा पवनी येथे दुचाकीवरून अपघात घडला होता.त्यात पती अतुल सेलोटे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती, तर मयुरीच्या डोक्याला मुका मार बसला होता.यामुळे तिचे मानसिक संतुलन बिघडले होते.याच कारणावरून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. अपघातात मयुरीच्या डोक्याला मार बसल्यानंतर वैद्यकीय उपचार करण्यात आले आणि त्यानंतर ति ४ डिसेंबरला फनुली येथील मामाच्या गावाला मंडईनिमित्ताने गेली होती.अश्यातच ८ डिसेंबरच्या रात्री ११ वाजतापासून ती मामाच्या घरूनच बेपत्ता झाली. नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली,पण ती कुठेही आढळून न आल्याने अड्याळ पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.दरम्यान,काल गुरुवारी सकाळच्या सुमारास  फनुली गावातील महिला पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेल्या असता त्यांना विहिरीतील पाण्यावर मृतदेह तरंगताना दिसून आला.सदरचा प्रकार गावात माहीत पडताच घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली. त्यातच मयुरीच्या नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेत  पाहणी केली असता मृतदेह मयुरीचा असल्याचे स्पष्ट झाले.मयुरीला दीड वर्षाची गोंडस चिमुकली आणि चार वर्षाचा मुलगा आहे.आपल्या मामासोबत दोन्ही लहान चिमुकल्यांनी घटनास्थळी धाव घेत आईचा मृतदेह पाहून एकच हंबरडा फोडला.त्यांचा हंबरडा पाहून अनेकांच्या डोळ्यातून अश्रू तरळले.घटनेने परिसरात शोककळा पसरली असून दोन्ही चिमुकले आईच्या मृत्यूने पोरकी झालीत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

‘आंबा महोत्सव-२०२६’; गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या आंबा वाणांचे प्रदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे.आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!