Saturday, September 5, 2026
Homeभंडारातहसील कार्यालयाच्या गेटवरच भोवळ आल्याने इसमाचा मृत्यू...

तहसील कार्यालयाच्या गेटवरच भोवळ आल्याने इसमाचा मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-गावावरून काही कामानिमित्त तहसील कार्यालयात गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा तहसील कार्यालयाच्या गेट जवळ भोवळ येऊन खाली कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २७ मार्चला दुपारच्या सुमारास तुमसर तहसील कार्यालय परिसरात घडली.सुरेश चावके वय ४५ वर्षे,रा.हसारा, ता.तुमसर,जि.भंडारा असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.
दहावी,बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या असून पुढील शैक्षणिक सत्राकरीता दस्तऐवजांची जुळवाजुळव करून एखाद्याचे जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला,निराधार योजनेचे फॉर्म वा इतर शेती विषयक कामांकरीता शेतकरी बांधवांसह सर्वसामान्य नागरिक तहसील कार्यालयात उन्हा-तान्हात हेलपाटे मारीत असतात,पण काम होण्याचे नावच घेत नाही.त्यातच अश्याच काही कामानिमित्त सुरेश चावके हे आज गुरुवारी दुपारच्या सुमारास तुमसर तहसील कार्यालयात गेले होते.तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच त्यांना अस्वस्थ वाटू लागले.अस्वस्थामुळे त्यांना भोवळ आली व ते खाली कोसळले.तहसील परिसरात असलेल्या नागरिकांनी दृश्य बघताच धाव घेतली.मात्र, सुरेश चावके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घटनेची माहिती तुमसर पोलीस प्रशासनास मिळताच पोलिसांनी पथकासह तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केला.घटनेचा पुढील तपास तुमसर पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!