Thursday, April 16, 2026
Homeभंडाराट्रॅक्टरची दुचाकीला समोरून धडक; दुचाकीस्वार जागीच ठार...

ट्रॅक्टरची दुचाकीला समोरून धडक; दुचाकीस्वार जागीच ठार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला असल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील मुंढरी येथील वळणावर काल,रविवारी सायंकाळी घडली.ऐन भाऊबीजेच्या सणाला घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.दिनेश पुनाराम झिजोटे वय २८ वर्षे,रा.मुंढरी बुज,असे मृताचे नाव आहे.
मुंढरी येथील दसाराम शेंडे यांच्या मालकीचा एमएच-३६/एल-२६८७ क्रमांकाचा ट्रॅक्टर घेवून चालक रोहा गावाकडून सायंकाळी मुंढरीकडे जात होता.तर मृतक दिनेश हा आपल्या सोबत्यासह मोटारसायकलने गावाकडे जात होता.वळणावर ट्रॅक्टरने मोटारसायकलला समोरून धडक दिली.यात चाकाखाली सापडल्याने दिनेश झिजोटे जागीच ठार झाला,तर गणेश सोनवणे किरकोळ जखमी झाला.घटनेची माहिती करडी पोलिसांना देण्यात आली.ठाणेदार विलास मुढे,राजेश डोंगरे,हेड कॉन्स्टेबल अमित कुंभरे,प्रफुल्ल वालदे, शिपाई बोरकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.मृतदेह तुमसर येथे उत्तरीय तपासणीकरिता पाठविण्यात आला.सदर वळण मार्ग अपघाताला कारणीभूत ठरला असून; वळणावर गतीरोधक लावण्याची गरज आहे.
मृतक दिनेश झिजोटे हा मुंढरी येथील रहिवारी असून; तो बांधकाम मिस्त्री होता.करडी येथील राजू नवखरे यांच्याकडे बांधकाम सुरू असल्याने काम आटोपून तो मोटारसायकलने मित्रासह गावाकडे जात होता.मात्र, काळ बनून आलेल्या ट्रॅक्टरने त्याचा घात केला. ऐन दिवाळसणात भाऊबीजेच्या दिवशी त्याच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबावर मोठा आघात झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असणार असून आज सकाळी अकरा वाजता...

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!