Saturday, May 30, 2026
Homeचंद्रपूरझाडीपट्टीत 'कोरम्या' नावाने प्रणयची नवी ओळख... - 'बाजारी विकलेली नार' नाटकातून...

झाडीपट्टीत ‘कोरम्या’ नावाने प्रणयची नवी ओळख… – ‘बाजारी विकलेली नार’ नाटकातून अभिनयाची छाप…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-झाडीपट्टीत दिवाळी पासून ते होळी पर्यंत चालणारी झाडीपट्टी रंगभूमीची नाटकं हा झाडीपट्टीतील लोकांच्या केवळ मनोरंजनाचा नव्हे तर जिव्हाळ्याचा विषय बनला आहे.झाडीपट्टी रंगभूमीच्या नाटकाला झाडीपट्टीतील लोकं भरभरून प्रेम देऊ लागले आहेत.झाडीपट्टी रंगभूमीचं एखाद नाटक प्रेक्षकांना आवडलं तर त्या नाटकाला आणि त्या नाटकात अभिनय करणाऱ्या कलावंतांना झाडीपट्टीतील रसिकमायबाप अक्षरशः डोक्यावर घेतात.मग ते नाटक आणि त्या नाटकात अभिनय करणारे कलावंत नकळत अजरामर होऊन जातात.
२०२४-२५ च्या झाडीपट्टी नाट्य हंगामात शिवम् थिएटर्स नागभीड-देसाईगंज-वडसाचं ‘बाजारी विकलेली नार अर्थात भाड्याची बायको’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आलं.युवराज गोंगले यांच्या लेखणी आणि दिग्दर्शनातून साकारलेल्या या नाटकाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.या नाटकाच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी तितकाच प्रतिसादही दिला. या नाटकात अभिनय करणाऱ्या कलावंतांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी दाद देत त्या कलावंतांना अक्षरशः डोक्यावर घेतले.या वर्षी या नाटकाचे जवळपास सत्तरच्या वर प्रयोग शिवम् थिएटर्सने एका हंगामात संपूर्ण झाडीपट्टीत सादर केले.विशेष म्हणजे ‘बाजारी विकलेली नार’ या नाटकातील मध्यवर्ती पात्र असलेल्या ‘काजळी’ (ममता गोंगले) यांचे भाऊ  ‘कोरम्या’ हे पात्र प्रणय देवगडे याने आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयातून खूप सुंदररित्या साकारले. चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील नांदेड येथे राहणाऱ्या प्रणयने या नाटकातून आपल्या अभिनयाची छाप रसिकमायबापाच्या मनावर पाडली. त्याने उत्तमरित्या साकारलेल्या या भूमिकेमुळे आज ‘कोरम्या’ ही त्याची ओळख बनली आहे.आता झाडीपट्टीतील बहुतेक लोकं त्याला ‘कोरम्या’ नावाने ओळखतात.
प्रणय देवगडे,झाडीपट्टी रंगभूमी कलावंत👇
 
‘कोरम्या’ नावाने मिळालेली हि नवी ओळख माझ्यासाठी माझ्या रसिकमायबापाकडून मिळालेलं बक्षिस आहे.यासाठी मी माझ्या रसिकमायबापाचा सदैव ऋणी राहीन.
त्याने रसिकमायबापासह या नाटकाचे लेखक- दिग्दर्शक युवराज गोंगले यांनी कोरम्याच्या पात्रासाठी त्याची निवड केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर क्रत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

रखरखत्या उन्हात शेतातच टाकली खाट अन् उपोषणास केली सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसून आज,शनिवार ३० मे पासून सकाळी दहा वाजे जालना...

लाखांदूर-देसाईगंज मार्गावर पेटत्या कारचा थरार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर-देसाईगंज मार्गावरील दुर्गा माता मंदिर पहाडीजवळ भर उन्हात पेटत्या कारचा थरार काल शुक्रवारी घडला.लाखांदूरहून निघालेली कार सोनी-चप्राळ पहाडीजवळ येताच धावत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!