- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या वरोरा शहरातील रत्नमाला चौकात आज,शुक्रवार १९ सप्टेंबरला दुपारच्या सुमारास एका चारचाकी वाहनाचा बर्निंग थरार नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवला.वाहनातून धूर निघत असतांनाच वाहन चालकासह अन्य दोघांनी प्रसंगावधान साधत वाहनाच्या बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला आणि क्षणात वाहन जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरीही घटनेने वाहन मालकाचे मोठे नुकसान झाले आहे.
एमएच ३१ एफयु ६६७३ क्रमांकाच्या अलक्झर या चारचाकी वाहनाने नागपूर येथील कुटूंबीय चंद्रपूरहून निघाले होते.नागपूरला जात असतांना वाटेतील वरोरा शहराच्या रत्नमाला चौकात चारकी वाहनातून अचानकपणे धूर निघू लागला.वाहनातून धूर निघताच सर्वजण बाहेर पडले.एकाने जवळच असलेल्या पेट्रोल पंपावर जाऊन अग्नीशामक यंत्र हातात घेत नाही, तोच अलक्झर वाहन संपूर्ण आगीत भस्म झाले.वाहन चालकाने प्रसंगावधान साधल्याने मोठी दुर्घटना टळली.
- Advertisement -

