Wednesday, July 15, 2026
Homeचंद्रपूरघरगुती वादातून विवाहित महिलेने नदीत उडी मारून केली आत्महत्या..

घरगुती वादातून विवाहित महिलेने नदीत उडी मारून केली आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील सास्ती येथील एका विवाहित महिलेने घरगुती वादातून नदीत उडी मारून आत्महत्या केल्याने कुटुंबिय शोकसागरात बुडाले आहे.शीतल प्रशांत मुळे वय ३८ वर्षे,रा.सम्राट चौक, बालाजी वॉर्ड,बल्लारपूर,जि.चंद्रपूर असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव असून मागील काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये खटके उडू लागल्याने शीतल ही सास्ती येथील आई-वडिलांकडे वास्तव्यास होती.विशेष म्हणजे,पाच वर्षांपूर्वी शितल ही आपल्या पहिल्या पतीपासून विभक्त होऊन तिने बल्लापुरातील प्रशांत मुळे याच्यासोबत विवाह केला होता.अश्यातच पतीसोबत होणाऱ्या वादामुळे ती माहेरी निघून गेली होती.दरम्यान,दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २० मार्च रोजी रात्रीच्या सुमारास कुणाला काहीही न सांगता ती घराबाहेर पडली होती.बराच उशीर होऊनही शीतल ही घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.प्रकरणी पोलिसांनी परिसरातील माहितीच्या आधारे शोध घेत तपास सुरू केला.या दरम्यान,गावाजवळील  वर्धा नदी परिसरात पाहणी केली असता काल शनिवारी दुपारच्या सुमारास शीतलचा मृतदेह नदी पत्रातील पाण्यावर तरंगताना दिसून आला. लगेच मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पोलिसांनी पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला.एका विवाहित महिलेने केवळ घरगुती वादामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!