Wednesday, June 3, 2026
Homeमुंबईग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..प्रवासात दिली खराब शिट; आयोगाने ग्राहकाला दिली लाखाची...

ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..प्रवासात दिली खराब शिट; आयोगाने ग्राहकाला दिली लाखाची भरपाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :- लांब पल्ल्याच्या हवाई प्रवासात केवळ जातानाच नव्हे, तर परततानाही बिझनेस क्लासमध्ये आरामदायी नव्हे, तर अत्यंत खराब सीट मिळाली. याप्रकरणी मुंबईतील ग्राहक तक्रार निवारण आयोगाने ग्राहकाला तिकिटाची २ लाख ३६ हजार रुपयांची संपूर्ण रक्कम परत करण्याबरोबरच एक लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश एअर इंडियाला दिला आहे. सोबतच मानसिक त्रासापोटी ५० हजार रुपये द्यावेत, असे आदेशात म्हटले आहे.

निवृत्त रिअर ॲडमिरल अनिलकुमार सक्सेना यांनी ३ जून २०२३ रोजी दिल्लीहून टोरंटोला एअर इंडियाच्या विमानाने प्रयाण केले होते; तर २४ जून २०२३ रोजी ते टोरंटोहून दिल्लाला एअर इंडियाच्याच विमानाने परतले.दोन्ही प्रवासांदरम्यान त्यांच्या वाट्याला खराब सीट आली.प्रवास १४ तासांचा असल्याने त्यांनी बिझनेस क्लास निवडला होता.

प्रवासाला जाताना त्यांना सीट खराब असल्याचे दिसून आले. विमानातील कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करूनही अडचण दूर झाली नाही. त्यांना दुसरी सीट देण्यात आली. ती सक्सेना यांच्या पसंतीस उतरली नाही. परतीच्या प्रवासातही असाच अनुभव आला. त्यांनी कंपनीकडे जून, जुलै आणि ऑगस्ट २०२३ मध्ये ई-मेलद्वारे तक्रार केली.त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी पत्र पाठवून नुकसानभरपाई मागितली. एअर इंडियाने चूक मान्य करत तिकीट रकमेच्या ७५ टक्के मूल्याचे ट्रॅव्हल व्हाऊचर दिले.तसेच, टोरंटो ते दिल्लीसाठी १० हजार रुपयांचे तिकीट व्हाऊचर दिले.

सक्सेना यांनी नुकसानभरपाई अमान्य करत एअर इंडियाच्या विरोधात दक्षिण मुंबईतील ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दावा दाखल केला होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!