- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-गडचिरोली असो वा कोणतेही शहर असो, गांजाची विक्री करणे म्हणजे गुन्ह्यात प्रत्यक्ष कृती करून एखाद्याच्या जीवनाशी खेळणे होय.गांजा सेवनात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकजण आहारी जाऊन सर्वकाही गमावून बसलेले दिसून येतात.गांजाची नशा इतकी खतरनाक मानली जाते की,एकदा सेवन केलेला व्यक्ती दोन दिवस उठत नसतो.अश्यातच गडचिरोली सोडून चंद्रपुरात गांजाची विक्री करतांना दोघांना चंद्रपूरच्या रामनगर गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकून त्यांच्याकडून १ किलो ७८१ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.केलेल्या कारवाईत तब्बल १ लाख चार हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.अजित रतन रॉय वय ३८ वर्षे,सत्यजित गौरंग मंडल वय २९ वर्षे दोघेही रा.उदयनगर,ता.मुलचेरा, जि.गडचिरोली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील तरुण चंद्रपुरात गांजा विक्रीच्या अनुषंगाने फिरत असल्याची माहिती रामनगर येथील गुन्हे शोध पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर रामनगर पोलिस स्टेशनमधील पथकाने सापळा रचून गडचिरोली रोडवरील डॉ. वरगंटीवार यांच्या हॉस्पिटलसमोरील मोकळ्या मैदानाकडे धाव घेतली.यावेळी दोघेजण एका प्लॉस्टिक पिशवीत गांजाच्या झाडाची पाने,फुले,बोंडे व बिया एकूण १ किलो ७८१ ग्रॅम बाळगून असल्याचे आढळून आले.त्या दोघांकडून गांजासह १ लाख चार हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.सदरची कारवाई रामनगरचे पोलिस निरीक्षक आसिफराजा शेख,एपीआय देवाजी नरोटे,हनुमान उगले,जितेंद्र आकरे,आनंद खरात,सचिन गुरनुले,पेतराज सिडाम, प्रशांत शेंदरे आदींनी केली.
- Advertisement -

