Thursday, September 3, 2026
Homeचंद्रपूरखोटी जाहिरात देऊन नोकरीचे आमिष; दोघांविरोधात गुन्हे दाखल..

खोटी जाहिरात देऊन नोकरीचे आमिष; दोघांविरोधात गुन्हे दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-हल्ली सगळीकडेच बेरोजगारांची फौज तयार झाली आहे.नोकरीसाठी धडपडणारे अनेक तरुण वय ओलांडून हताश होऊ लागलेत.काही तरुण नोकरीसाठी निघणाऱ्या जाहिरातीकडे टक लावून पाहत असतात,हे अनेकांना माहीत आहे.त्यामुळेच फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढलेले दिसून येतात.असाच प्रकार चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल शहरात उघडकीस आला आहे.नोकरीचे आमिष दाखवून पहिल्यांदा खोटी जाहिरात तयार केली व नंतर पैसे रेटून तिर्री दाखविण्यात आले.सदर प्रकार उघडकीस येताच दोघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.राजू पुद्धटवार रा.गुजरी चौक,मूल व प्रशांत ऊर्फ नाना आकेवार रा.पंचशील वॉर्ड,मूल अशी आरोपींची नावे असून राहुल महाजनवार यांच्या तक्रारीवरून मूल पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी राजू पुद्धटवार व प्रशांत आकेवार या दोघांनी मूल नगर परिषदेमध्ये नोकर भरतीची बनावट जाहिरात तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली होती.या प्रकारातून सुशिक्षित बेरोजगारांना लाखोंना गंडवल्याची चर्चा शहरात सुरू होती. दरम्यान,१२ जून २०२५ रोजी परसोडा येथील साईश्वर पुलगमवार यांनी नगर परिषदेत लिपिकाची नोकरी लावून देण्याच्या नावाखाली १० लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक झाल्याची तक्रार मूल पोलिस ठाण्यात दाखल केली.या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी सुरू केली.राहुल महाजनवार यांनीही नोकरीच्या नावाखाली ६ लाख ५० हजारांनी फसवणूक झाल्याची तक्रार केली.साईश्वर भालचंद्र पुलगमवार यांनीही तक्रार दाखल केली.नगर परिषदेची बनावट जाहिरात तयार करून समाज माध्यमात व्हायरल करणे,नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना फसवणे व इतर गंभीर गुन्हे आरोपींविरुद्ध दाखल करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!