Tuesday, June 23, 2026
Homeदेसाईगंजक्रांतिविर बाबुराव सेडमाके यांच्या विचारांचा आदर्श जोपासा- रामदास मसराम यांचे प्रतिपादन...

क्रांतिविर बाबुराव सेडमाके यांच्या विचारांचा आदर्श जोपासा- रामदास मसराम यांचे प्रतिपादन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज :- थोर क्रांतिकारक विर बाबुराव सेडमाके यांनी जुलमी इंग्रज राज्य व्यवस्थेविरुद्ध लढा उभारुन चंन्द्रपुर,गडचिरोली सारख्या अतिदुर्गम भागाचा इतिहास रचला;त्यांच्या विचारांची प्रेरणा घेवुन आदिवासी समाज बांधवासह बहुजन समाज बांधवांनी प्रस्थापित सत्तेच्या विरोधात यल्गार पुकारावा; असे प्रतिपादन आदिवासी समाजाचे नेते रामदास मसराम यांनी केले.

देसाईगंज येथिल शिक्षक पतसंस्थेच्या  सभागृहात आज दिनांक -२१ ऑक्टोंबर २०२३ रोजी क्रांतिविर बाबुराव सेडमाके यांच्या स्मृती दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी एकनाथ पिलारे,दिलिप नाकाडे,बंडुभाऊ सिडाम,भाष्कर कन्नाके,भुनेश्वर ढोमणे,प्रदिप मुंगणकर,योगेश ढोरे, कोडापे गुरुजी,प्रफुलदास शेन्डे,प्रेमदास मेश्राम, जि.एन.लाडे,राजुभाऊ मेश्राम,राजुभाऊ बुल्ले,ज्ञानदेव पिलारे,पंकज ढोरे,नंदरधने गुरुजी,झुरे गुरुजी,वैरागडे यांचेसह अण्य मान्यवर उपस्थित होते.प्रसंगी विचार व्यक्त करतांना रामदास मसराम म्हणाले की,  क्रांतिविर बाबुराव सेडमाके यांनी १८ व्या शतकात चंन्द्रपुर,गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल अतिदुर्गम भागात इंग्रज शासन व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारले होते,या भु-भागावरिल जमिन,जंगल आणि जलाचे रक्षण संवर्धन आणि संगोपण आदिवासी आणि बहुजन समाज करतो.मग अतिरिक्त कर आम्ही शासनाला का म्हनुण भरायचा?  त्याचबरोबर इंग्रजांनी केलेले कायदे हे गुलामगिरी लादनारे असल्यानेअल्पवयिन असलेल्या बाबुराव सेडमाके यांनी जुलुमी इंग्रज सरकार विरोधात बंड पुकारले.फोडा आणि राज्य करा; हे धोरण अवलंबुन त्यांच्याच परिवारातिल बहिणीने इंग्रजांच्या आमिषाला बळी पडुन बाबुराव सेडमाके यांना मोठ्या शिताफिने पकडुन दिले.वयाच्या २५ व्या वर्षी इंग्रजांनी अतिशय क्रृरपणे फाशिची शिक्षा दिलीबाबुराव सेडमाके यांच्या विचारांची प्रेरणा घेवुन आदिवासी समाजबांधवांसह बहुजन बांधवांनी दडपशाही अवलंबलेल्या प्रस्तापित शासन विरोधात बंड पुकारले पाहिजे;असे प्रतिपादन रामदास मसराम यांनी विर बाबुराव सेडमाके स्मृती  अभिवादन दिनी केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!