Monday, September 21, 2026
Homeनवी दिल्लीकोणत्याही नेत्याला जास्त काळ तुरुंगात ठेवता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय - अखेर...

कोणत्याही नेत्याला जास्त काळ तुरुंगात ठेवता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय – अखेर अरविंद केजरीवाल यांना १० लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नवी दिल्ली :-अरविंद केजरीवाल यांना १० लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुप्रीम कोर्टाने केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे.दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)आम आदमी पक्षाचे (आप) सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती.आता त्यांना जामीन मिळाल्याने त्यांचा जेलबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्वल भुईया यांच्या खंडपीठाने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटींवर आणि १० लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. केजरीवाल यांच्यावरील अटी ईडी प्रकरणात जामीन मंजूर करताना सारख्याच असतील.यापूर्वी,सर्वोच्च न्यायालयाने सीएम केजरीवाल यांची अटक बेकायदेशीर मानली नव्हती; परंतु आता कोणत्याही नेत्याला जास्त काळ तुरुंगात ठेवता येणार नाही; असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालय👇

आम्ही नियमित जामिनाच्या प्रश्नावर चर्चा केली आहे. अनेक निर्णयांमध्ये,एखाद्याला खटला न चालवता दीर्घकाळ नजरकैदेत ठेवणे चुकीचे मानले गेले आहे. जेव्हा ती व्यक्ती तुरुंगाबाहेर आली तर केस किंवा समाजाचे काही नुकसान होण्याची शक्यता असते, तेव्हाच दीर्घकाळ कैदेत ठेवणे हे केले जाते.या खटल्यात मोठ्या प्रमाणात आरोपी,साक्षीदार आणि कागदपत्र आहेत.खटल्याला वेळ लागेल,त्यामुळे जामिनावर सुटण्याचा आधार आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील कथित दारू घोटाळा प्रकरणात सीबीआयने दोन वर्षांपासून या प्रकरणात कोणालाही अटक केली नाही.केजरीवाल यांना मनी लाँड्रिंगसारख्या कडक कायद्याखाली जामीन मिळाला आहे.या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणात अन्य आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला असून केजरीवाल समाजाला धोका नसून ते फरार होण्याची शक्यता नाही; त्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे; तर भ्रष्टाचाराच्या केसमध्ये ते तुरुंगात आहेत.केजरीवाल यांनी सत्र न्यायालयात न जाता उच्च न्यायालयात धाव घेतली,असा युक्तिवाद सीबीआयने केला.आमचा सुरुवातीचा आक्षेप हाच आहे,की या खटल्यात प्रथम सत्र न्यायालयात तपासणी केली पाहिजे.ते थेट उच्च न्यायालयात गेले आणि सत्र न्यायालयात गेले नाहीत.त्यानंतर उच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात आला, याप्रकरणात कोणतीही प्रक्रिया पाळली गेली नाही, असे सीबीआयने म्हटले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!