Monday, September 21, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने मतदान जनजागृती.. - सर्वांनी आवर्जून मतदान करावे- सरपंचा अपर्णा...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने मतदान जनजागृती.. – सर्वांनी आवर्जून मतदान करावे- सरपंचा अपर्णा राऊत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-येत्या २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची सर्वत्र  जोमात तयारी सुरू असल्याचे दिसत आहे.आरमोरी विधानसभा क्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढावी व जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे; याकरिता कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने मतदारांना जागृत करून मतदानाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत,उपसरपंच गजानन सेलोटे, ग्रामसेविका मेघना राऊत,ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य,कर्मचारीवृंद प्रदीप तुपट,अजय भर्रे,गायकवाड यांच्या वतीने मतदानाच्या अधिकाराची माहिती, मतदान यंत्राची माहिती,नोटाची माहिती,मतदानाची वेळ इत्यादीविषयी पत्रकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.याशिवाय व्यसनाधीनता,टीव्ही,मोबाइलचे दुष्परिणाम,शिक्षणाचे,अभ्यासाचे महत्त्व यावरही मार्गदर्शन करण्यात येत आहे.आपले एक मत देशाची, राज्याची परिस्थिती बदलू शकते.आपण सर्वांनी नैतिक मतदान करावे,कोणत्याही प्रलोभनाला बळी पडून मतदान करणे योग्य नाही.सर्वांनी नैतिकतेने, स्वाभिमानाने मतदान करावे; असे आवाहन करण्यात येत आहे.
सरपंचा अपर्णा राऊत यांनी म्हटले की,मतदान हा आपल्याला मिळालेला सर्वांत महत्त्वाचा अधिकार असून मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे.ती आपणा सर्वांची जबाबदारी आहे,तेव्हा सर्वांनी आवर्जून मतदान करावे, असे मतदारांना आवाहन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

सिंदेवाही प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी प्रशांत गेडाम यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रेस क्लब सिंदेवाहीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी प्रशांत गेडाम, उपाध्यक्षपदी संतोष नन्नावार तर सचिवपदी सुधाकर गजभिये यांची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!