- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी चालक ग्रामसेवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना काल,गुरुवारी ७ नोव्हेंबरच्या दुपारी दीड वाजताच्या सुमारास गोंदिया-गोरेगाव मार्गावरील कारंजा येथील हरिओम कॉलनी जवळ घडली.रंजन भैयालाल नेवारे वय ५२ वर्षे असे अपघातात ठार झालेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की,गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत पाथरी,सोनेगाव येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक रंजन नेवारे हे काल गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान ते आपल्या दुचाकीने गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार तपासणी नाका येथे कर्तव्याच्या ठिकाणी जाण्यास निघाले होते.
दरम्यान गोंदिया-गोरेगाव मार्गावरील हरिओम कॉलनी जवळ त्यांच्या दुचाकीला कार क्रमांक एमएच ४९, एएस ०९१७ ने जोरदार धडक दिल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती गोंदिया ग्रामीण पोलिसांनी मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत याप्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले.
- Advertisement -

